अफगाणिस्तानात तालिबानी राजवट येऊन एक महिन्याहून अधिक काळ उलटलाय. त्यामुळं तालिबानी राजवटीचा प्रभाव आता मोठ्या सार्वजनिक विद्यापीठांवरही दिसून येत आहे.
अफगाणिस्तानात तालिबानी राजवट येऊन एक महिन्याहून अधिक काळ उलटलाय. त्यामुळं तालिबानी राजवटीचा प्रभाव आता मोठ्या सार्वजनिक विद्यापीठांवरही दिसून येत आहे. यात राजवटीचं जेंडर धोरण हे नवीन राजवटीच्या विस्तृत योजनांपैकी एक आहे. या धोरणाचा एक भाग म्हणजे, विद्यापीठातील वर्गांमध्ये रूम्स-डिवाइडिंग पडदे बसविणे. शिवाय, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शिफ्ट देखील कार्यान्वित करणे, असं हे तुघलकी धोरण असणार आहे.अफगाणिस्तानात काबुल विद्यापीठाची स्थापना 1932 मध्ये झाली. या विद्यापीठात सुमारे 12 हजार महिला विद्यार्थी आहेत, तर एकूण 26 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच तीन दशके जुने असलेल्या कंधार विद्यापीठात 1000 महिला आहेत, 10,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महिलांच्या उच्च शिक्षणाच्या भविष्यासाठी तालिबाननं आपली धोरणं आखण्यास सुरुवात केलीय.कंधार विद्यापीठाचे कुलगुरू अब्दुल वहीद वासिक यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं, की सार्वजनिक विद्यापीठं त्यांच्याकडे पैसे असतील, तरच उघडू शकतात. या विद्यापीठांत खासगी विद्यापीठांपेक्षा वर्गात जास्त विद्यार्थी असतात. खाजगी विद्यापीठांत प्रत्येक वर्गात फक्त 10 ते 20 विद्यार्थी असतात आणि म्हणूनच, अशा वर्गांमध्ये पुरुष आणि महिलांना वेगळे करणं खूप सोपं आहे. आमच्याकडे एका वर्गात सुमारे 100 ते 150 विद्यार्थी आहेत. त्यामुळे आमच्यासाठी ते इतके सोपे नाही, असं त्यांनी सांगितलं.अफगाणिस्तानमध्ये सुमारे 40 सार्वजनिक विद्यापीठे आहेत. तालिबान्यांनी सहशिक्षणावर बंदी घालण्याचे आदेश दिल्यानंतर, सार्वजनिक विद्यापीठांना स्थानिक वास्तवाच्या आधारे ही योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना उच्च शिक्षण मंत्रालयाने दिल्या होत्या. आत्तासाठी, बहुतेक विद्यापीठांनी असं प्रस्तावित केलंय, की स्त्रियांना पडद्यामागून किंवा क्यूबिकल्समधून वर्गांत उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, असा फतवा काढला गेलाय.तखर विद्यापीठाचे कुलपती खैरुद्दीन खैरखा म्हणाले, या विद्यापीठाची स्थापना 30 वर्षांपूर्वी झाली. येथे एका वर्गात 15 पेक्षा जास्त महिला असून पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र वर्ग आयोजित करण्याची आमची योजना आहे. हे करण्यासाठी आम्ही सकाळ आणि दुपारच्या शिफ्ट सुरू करणार आहोत. जर 15 पेक्षा कमी स्त्रिया असतील, तर आम्ही त्यांना वर्गात पुरुषांपासून वेगळे ठेवण्यासाठी डिवाइडर खरेदी करू, जसं आम्ही रुग्णालयांमध्ये वापरतो तसं, असं त्यांनी सांगितलं.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.