Treasure in Afghanistan esakal
जगातील सर्वात गरीब देशांमध्ये समाविष्ट असलेला हा देश अनेक खजिन्यांचा मालक आहे. अफगाणिस्तानच्या (Afghanistan) खाण आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात 1 ट्रिलियन डॉलर म्हणजेच, 75.55 लाख कोटी रुपयांची नैसर्गिक संसाधने आहेत.
जगातील सर्वात गरीब देशांमध्ये समाविष्ट असलेला हा देश अनेक खजिन्यांचा मालक आहे. अफगाणिस्तानच्या (Afghanistan) खाण आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात 1 ट्रिलियन डॉलर म्हणजेच, 75.55 लाख कोटी रुपयांची नैसर्गिक संसाधने आहेत. तर, 38 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशात 2.22 लाख कोटी किलोग्रॅम लोहखनिज, 1.30 लाख किलोग्रॅम संगमरवरी आणि 1.40 लाख किलोग्रॅम दुर्मिळ धातू आहेत.अफगाणिस्तानमधील खनिजे आणि धातूंच्या स्त्रोताचा अभ्यास करणारे भूवैज्ञानिक स्कॉट माँटगोमेरी म्हणाले, की या देशात 7 ते 10 वर्षे मोठ्या प्रमाणावर खाणकाम सुरू राहिल्यास देशाची आर्थिक स्थिती सुधारू शकते. परंतु, येथील सुरक्षिततेचा अभाव, कमकुवत कायदे आणि भ्रष्टाचार यामुळं या देशाचा विकास आणि खाण क्षेत्राचा विस्तार होण्याची शक्यता कमीच आहे.1960 ते 70 च्या दरम्यान सोव्हिएत युनियन (Soviet Union) आणि पूर्व युरोपीय देशांनी एकत्रितपणे या देशाच्या भौगोलिक स्त्रोतांचे सर्वेक्षण केले. पण, अनेक दशकांच्या युद्ध, गृहयुद्ध आणि दहशतवादामुळं 'अफगाणिस्तानचा खजिना' जमिनीखाली गाडला गेला. 2010 मध्ये युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल (United States Geological) सर्व्हे (USGS) आणि अफगाणिस्तान जिओलॉजिकल (Afghanistan Geological) सर्व्हे (AGS) यांनी मिळून 34 राज्यांमध्ये 24 ठिकाणं शोधून काढली, जिथं नैसर्गिक संसाधनांचे प्रचंड साठे आहेत. तर, 75.55 लाख कोटी रुपयांची नैसर्गिक संपत्ती येथे पडून असल्याचं आढळून आलं.या अभ्यासात असंही आढळून आलं, की 15.39 दशलक्ष किलो शिसे-जस्त, 100 दशलक्ष किलो सेलास्टाइट आणि 2698 किलो सोने आहे. अफगाणिस्तानमध्ये सर्वाधिक लोहखनिज आहे. दोन लाख आयफेल टॉवर्स बांधण्यासाठी 2.22 लाख कोटी किलोग्रॅम लोहखनिज वापरता येईल. शिवाय, 1889 साली पॅरिसमध्ये बांधलेल्या 1063 फूट उंच आयफेल टॉवरच्या बांधकामात 73 लाख किलोग्रॅम लोखंडाचा वापर करण्यात आला होता.याशिवाय, अफगाणिस्तानच्या बडकशान आणि कंदाहार प्रांतात अॅल्युमिनियमचे साठे आहेत. येथे 18,300 कोटी किलोग्रॅम अॅल्युमिनियम उपलब्ध आहे. हा जगातील दुसरा सर्वात जास्त वापरला जाणारा धातू आहे.अफगाणिस्तानमध्ये 2698 किलो सोन्याचा साठा आहे. त्याचा विस्तार बडकशान ते ताखर आणि गझनी ते जाबुलपर्यंत आहे. इथं इतकं सोनं आहे, की त्यापासून किमान 8 ग्रॅमची 3 लाख सोन्याची नाणी बनवता येतील. अफगाणिस्तानमध्ये 12,400 दशलक्ष किलोग्राम तांबे आहे.अफगाणिस्तान हा जगातील आठवा उंच पर्वतीय देश आहे. इथं हिंदुकुश हिमालयाची (Hindu Kush Himalayas) रांग आहे. त्यामुळं देशातील अनेक भाग असे आहेत, जिथं जाणं कठीण आहे. मात्र, इथं संगमरवरी, चुनखडी, वाळूचा खडक यांचं प्रमाण खूप जास्त आहे. अफगाणिस्तानमध्ये 1.30 लाख कोटी किलोग्रॅम संगमरवरही आहे.देशात चुनखडी आणि वाळूचा खडक यांचं प्रमाणही खूप जास्त आहे. सिमेंट तयार करण्यासाठी चुनखडीचा वापर केला जातो. याशिवाय, याचा उपयोग टूथपेस्ट आणि पेंट बनवण्यासाठीही केला जातो. बडकशान, हेरात आणि बाघलान प्रांतात 50 हजार कोटी किलोग्रॅम चुनखडी आहे.याशिवाय, अफगाणिस्तानमध्ये औद्योगिक खनिजांचा खजिना आहे. देशात 1.40 लाख कोटी किलोग्रॅम दुर्मिळ खनिजे आणि धातू आहेत. यामध्ये लॅपिस लाझुली, अॅमराल्ड आणि रुबीज यांचा समावेश आहे. सर्वाधिक प्रमाण 15,200 दशलक्ष किलोग्रॅम बॅराइट आहे, जे तेल आणि वायू उद्योगात ड्रिलिंगसाठी वापरलं जातं.अफगाणिस्तान आपल्या 90 टक्के उत्पादनांची तीन देशांमध्ये सर्वाधिक निर्यात करतो. संयुक्त अरब अमिरातीमध्ये 45 टक्के, पाकिस्तान 24 टक्के आणि भारतात 22 टक्के आहे. मात्र, 15 ऑगस्ट 2021 पासून हा देश तालिबानच्या ताब्यात आल्यापासून अफगाणिस्तानमधून निर्यात-आयात व्यवसाय बंद आहे. 2 सप्टेंबर 2021 रोजी तालिबाननं चीनच्या मदतीनं खनिज उद्योग वाढवण्याचा निर्णय घेतलाय. हा संपूर्ण अभ्यास अल जजिरामध्ये प्रकाशित झाला आहे.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.