patchup after breakup Sakal
प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना...प्रत्येकालाच कधीना कधी प्रेम होतं. प्रेमाचं नातं अनेक प्रकारच्या भावनांना सामना करावा लागतो. प्रेम, भांडण, आनंद, पश्चाताप अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागते. यानंतरही काही नाती टिकून राहतात, तर बऱ्यादचा काही कारणांमुळे या कोमल नात्यात अडचणीही येतात. काहीवेळा नात्यातील जोडप्याचे ब्रेकअप होते. परंतु काही काळानंतर दोघांना कळते की ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. मग दोघांनाही एकमेकांशी कसे बोलावे हे समजत नाही? त्यामुळंच बेकअपनंतर काही गोष्टी करणं टाळावं, जेणेकरून तुम्ही हवं असल्यास तुम्ही पुन्हा पॅचअप करू शकता. चला, त्या गोष्टी काय आहेत, ते जाणून घेऊया. (After the breakup, there may be a patchup with the ex girlfriend again! just keep these things in mind)
1. सोशल मीडियावर ब्रेकअपची चर्चा शेअर करू नका- आजच्या सोशल मीडियाच्या युगात, लोकांना सोशल प्लॅटफॉर्मवर प्रत्येक गोष्ट अपडेट करण्याची आवड आहे. मग ते आजारी असल्याचं अपडेट असो किंवा मग नवीन वस्तू विकत घेतल्याचं...अशा परिस्थितीत जर एखाद्याचे ब्रेकअप झाले आणि त्याने सोशल मीडियावर त्याची माहिती दिली तर त्याचा खूप चुकीचा परिणाम होतो. नेहमी लक्षात ठेवा, ब्रेकअपबद्दल किंवा इतर वैयक्तिक गोष्टी सोशल मीडियावर कधीही काहीही पोस्ट करू नका. तुमचे वैयक्तिक आयुष्य तुमच्यापुरतं राहूद्या. त्याला सार्वजनिक करण्याची चूक करू नका.2. लगेच कोणाशीही डेट करू नका- जर एखाद्याचे ब्रेकअप झाले असेल तर त्याच्या जोडीदाराला तो त्याच्याशिवाय कसा आहे, हे जाणून घ्यायची इच्छा असते. जर तुम्ही ब्रेकअपनंतर काही दिवसातच दुसऱ्या मुला किंवा मुलीला डेट करायला सुरुवात केली आहे, तर तुमच्या पूर्वाश्रमीच्या जोडीदाराला याची माहिती मिळाली, तर तुमचं पॅचअपचे सर्व मार्ग बंद होतील. म्हणूनच ब्रेकअप झाल्यानंतर लगेच दुसऱ्याला डेट करण्याचा विचार कधीही करू नका.
3. ब्रेकअपचे कारण जाणून घ्या- ब्रेकअप झाल्यानंतर अनेकदा लोक लक्ष देत नाहीत, ब्रेकअप का झाले? कदाचित आपण चूक केलेली असू शकते. ब्रेकअपचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमचे उत्तर तुम्हाला स्वतःहून मिळेल. कारण जाणून घेतल्यानंतर जर तुम्ही ती चूक सुधारली, तर साहजिकच तुमचे पॅचअप होऊ शकते.
4. गैरवर्तन करू नका- अनेक वेळा मुलं-मुली रागावतात आणि अशा गोष्टी बोलतात, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो. ब्रेकअप दरम्यान कधीही अपशब्द बोलू नका. असे झाले तर पॅचअपची आशा मावळते. 5. जबरदस्तीने पॅच अप करू नका- ब्रेकअप नंतर लोक अनेकदा त्यांच्या जोडीदाराला पॅचअपसाठी भाग पाडू लागतात. अशा वेळी समोरच्या व्यक्तीला असे वाटू शकते की तुम्ही त्याच्यावर दबाव आणत आहात. असे झाल्यास पॅचअपची आशा संपुष्टात येऊ शकते, त्यामुळे असं करणं टाळा.6. चुकीच्या गोष्टी टाळा- ब्रेकअपनंतर लोक अनेकदा चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित होतात. तुमचा ब्रेकअप झाला असेल तर स्वत:ला वेळ द्या. मादक पदार्थांचे व्यसन आणि दु:ख देणाऱ्या गाण्यांपासून दूर राहा, नाहीतर ब्रेकअपच्या वेदना आणखी वाढवू शकतात. Sakalब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.