Agneepath Scheme Violence esakal
केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला बिहार, राजस्थानमध्ये तरुणांकडून जोरदार विरोध सुरू झालाय.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या भरती (Indian Army Recruitment) प्रक्रियेत आमूलाग्र बदल सूचवणाऱ्या अग्निपथ योजनेवर (Agneepath Scheme) बुधवारी बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेशमधून तरुणांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याच बरोबर निवृत्त लष्करी अधिकारी व सामरिक तज्ज्ञांनीही या योजनेवर शंका उपस्थित केल्या आहेत.आज बिहारमधील (Bihar) बक्सर व मुझफ्फरपूर इथं शेकडो युवक रेल्वे स्थानकानजीक जमा झाले व त्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली. या युवकांकडं हातात लाठ्या-काठ्या होत्या.
निदर्शकांनी बेगुसराय राष्ट्रीय महामार्गावर धरणे धरले व ही योजना तरुणांवर अन्यायकारक असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. काही ठिकाणी आग लावण्याच्याही घटना घडल्या.राजस्थान (Rajasthan) व उत्तर प्रदेशातही (Uttar Pradesh) अग्निपथला विरोध दिसून आला. उत्तर प्रदेशात आंबेडकरनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तरुण रस्त्यावर दिसून आले. जयपूरमध्येही निदर्शक तरुणांनी या योजनेवर नाराजी व्यक्त केलीय. आम्ही दोन वर्षे लष्कर भरतीची वाट पाहात होतो व आता आमच्यापुढं ही योजना सरकारनं पुढं ठेवली असं तरुणांचं म्हणणं होतं. खासदार, आमदार ५ वर्षांसाठी सत्तेवर असतात आम्ही फक्त ४ वर्षेच का काम करायचं असा सवाल युवकांचा होता.आम्हाला पेन्शन व कँटिनच्या सोयी मिळणार नाहीत, असाही तरुणांचा आरोप होता.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.