Agnipath Recruitment scheme Sakal
केंद्र सरकारने सैन्यभरतीसाठी नुकतीच एक नवी योजना जाहीर केली आहे. अग्निपथ या योजनेमुळे मात्र तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे.लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी हिंसक आंदोलन केलं असून उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यात आंदोलकांनी एका रेल्वेलाही आग लावण्यात आली. त्यावेळी रेल्वेच्या इतर डब्यांनी पेट घेऊ नये, यासाठी पोलीस स्वतः रुळावरुन उतरुन रेल्वेचे डबे हटवण्याच्या कामी लागले आहेत. दरम्यान, आंदोलकांनी ट्रेनची मोठ्या प्रमाणावर तसंच रेल्वे स्थानकावरच्या संपत्तीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अग्निपथ योजनेंतर्गत चार वर्षांसाठी अग्निवीरांची भरती करण्यात येणार आहे. या घोषणेनंतर बिहारमध्ये निषेधाचा सूर उमटला. त्याचे पडसाद उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, जम्मू, हिमाचल प्रदेश, झारखंड, राजस्थान, मध्यप्रदेशमध्येही उमटले आहेत. बिहारमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तरुणांनी रेल्वेमार्ग अडवले, रस्त्यांवर जाळपोळ केली. भाजपाच्या एका आमदाराच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.या आंदोलनामुळे विविध रेल्वे स्थानकांवरुन निघणाऱ्या ८ रेल्वे सेवांवर परिणाम झाला आहे. या तरुणांचा रोष आणि विरोधकांच्या टीकेनंतर केंद्र सरकार मागच्या पावलावर आलं आहे. या योजने अंतर्गत सैन्यभरतीसाठी वयोमर्यादा २१ वर्षे होती. मात्र आता ही वयोमर्यादा २३ वर्षे करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. (फोटो सौजन्य: ANI)ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.