Janmashtami 2022- Marathi celebrity Dahihandi Celebration and fees to attend celebration Google
Janmashtami 2022: दोन वर्षानंतर पुन्हा जल्लोषात दहीहंडी सण साजरा होताना दिसत आहे. यामुळे अर्थातच यंदा या सेलिब्रेशनमध्ये मराठी कलाकार सहभागी होणार हे ओघानं आलंच. पण यंदा पुन्हा एकदा चर्चा रंगतेय ती कलाकारांच्या सुपारीची.
दोन वर्षापूर्वी पर्यंत अमृता खानविलकर आपल्या एका परफॉर्मन्ससाठी २ ते ३ लाख घ्यायची. अर्थातच दोन वर्षानंतर तिनं तिच्या 'सुपारी' च्या किमतीत वाढ केली असणार हे नाकारता येत नाही. हा आकडा ४ ते ५ लाखावर पोहोचल्याचं सूत्रांकडून कळालं आहे.'चला हवा येऊ द्या' या शो मुळे भाऊ कदम हे नाव घराघरात पोहोचलंय. भाऊला मोठ्या दहीहंड्यांमध्ये सहभागी व्हायचं आग्रहाच निमंत्रण दरवर्षी असतं. मोठ्या राजकीय नेत्यांच्या दहीहंडीत जायला भाऊही १ ते २ लाख रुपये चार्ज करतो. पण ज्याच्या एन्ट्रीनं वातावरण प्रफुल्लित होतं त्याला इतकं मानधन द्यायला राजकीय नेतेही मागेपुढे पाहत नाहीत. अंकुश चौधरी सध्या त्याच्या 'दगडी चाळ २' सिनेमामुळे चर्चेत आहे. अंकुशही आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी किंवा मंडळांच्या आग्रहास्तव मोठ्या दहीहंड्यांच्या ठिकाणी हजेरी लावतो. अंकुश चौधरी दहीहंडीसाठी म्हणे ४ ते ५ लाख चार्ज करतो. यंदा एखाद्या लाखानं त्याच्या सुपारीचा भाव वधारलाच असावा.बिग बॉसच्या पहिल्या सिझनची विजेती ठरलेली मेघा धाडेला देखील अनेक दहीहंडी मंडळं बोलावतात. दिवसातून २ ते ३ दहीहंडी मंडळांना मेघा हजेरी लावते, आणि प्रत्येकी ६० ते १ लाख अशी तिच्या सुपारीची किंमत असते, असं जवळच्या सूत्रांनी सांगितले.सोनाली कुलकर्णी हे मराठी सिनेसृष्टीतलं मोठं आणि ग्लॅमरस नाव. सोनालीनं दोन वर्षापूर्वी पर्यंत अनेकदा मोठ्या दहीहंडी मंडळांच्या ठिकाणी जाऊन परफॉर्म केलं आहे. तिच्या 'अप्सरा' गाण्याला दहीहंडीत विशेष फर्माईश असते. सोनाली ३ ते ४ लाख या परफॉर्मन्सेससाठी चार्ज करायची. यंदा ती अमेरिकेत आहे एका कार्यक्रमानिमित्तानं. पण जर भारतात असती तर नक्कीच तिनं दहीहंडीत सहभाग घेतला असता, परफॉर्म केलं असतं, सूत्रांच्या माहितीनुसार सोनाली सध्या कुठल्याही इव्हेंटमध्ये परफॉर्म करताना ६ ते ७ लाख चार्ज करत आहे. अभिनेत्री संस्कृती बालगुडे उत्तम नृत्य करते. अनेक कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसते. ती एका परफॉर्मन्सेससाठी २ ते ३ लाख चार्ज करते. आता ही किमंत आयोजक किती मोठे आहेत यावरनं अनेकदा ती ठरवते. तिनं देखील अनेक दहीहंडी मंडळांसाठी परफॉर्म केलं आहे. यावर्षी तिनंही ३ ते ४ लाख अशी आपल्या सुपारीची किंमत ठेवल्याचं बोललं जात आहे.
कोणत्याही मोठ्या इव्हेंटमध्ये अभिनेत्री मानसी नाईक परफॉर्म करतेच. ती उत्तम डान्सर तर आहेच पण एन्टरटेनर ही आहे. मानसीच्या दहीहंडीच्या सुपारीचा आकडा हा साधारण २ ते ३ लाख असा आहे. स्वप्निल जोशी हा कृष्ण म्हणून आजही जनमानसात प्रसिद्ध आहे. त्यांच्या श्रीकृष्णा मालिकेचा पगडाच प्रेक्षकांवर मोठा आहे. स्वप्निल दहीहंडी मंडळांमध्ये उपस्थित राहण्यासाठी ५ ते ६ लाख रुपयांची सुपारी घेतो असं बोललं जात आहे. त्याच्या 'गोविंदा' सिनेमाच्या प्रमोशनसाठी मात्र तो अनेक छोट्या -छोट्या दहीहंड्यांना उपस्थित राहिला होता अन् त्यावेळी त्यानं चाळीतल्या दहीहंड्यांना उपस्थित राहण्यासाठी कोणतीही किंमत आकारली नव्हती असं बोललं जात आहे. पण हो, मोठ्या दहीहंड्यांसाठी त्यांने आपल्या सुपारीची किमंत यंदा ७ लाखावर नेली असल्याचं बोललं जात आहे. हृता दुर्गुळे हे सध्या मराठी मालिकाविश्व आणि सिनेसृष्टीतलं मोठं नाव. त्यामुळे अर्थाच दहीहंडीच्या दिवशी तिला डिमांड असणार हे नक्की. हृताही यंदा पुण्यात दहीहंडी मंडळांना भेट देतेये. आणि यासाठी तिनेही १ ते २ लाख चार्ज केल्याचं बोललं जात आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.