उत्खननात प्राचीन गावं, वास्तू, शिल्पं आणि अनेक प्रकारच्या वस्तू सापडतात. मात्र, प्रयागराजमध्ये एक अनोख प्रकरण समोर आलंय.
नवी दिल्ली : उत्खननात प्राचीन गावं, वास्तू, शिल्पं आणि अनेक प्रकारच्या वस्तू सापडतात. मात्र, प्रयागराजमध्ये एक अनोख प्रकरण समोर आलंय. येथे नदी नाल्यांखाली वाहत असल्याचे पुरावे सापडलेत. हेलिकॉप्टरमधून केलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वेक्षणात ही बाब समोर आलीय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून, त्याचा भविष्यात मोठा उपयोग होऊ शकतो, असा अंदाजही व्यक्त केला जातोय.अॅडव्हान्स्ड अर्थ अॅण्ड स्पेस सायन्स (Advanced Earth and Space Science) या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असं समोर आलंय, की प्रयागराजमध्ये सध्या गंगा-यमुना संगमाखाली एक प्राचीन नदी (Ancient River) सापडलीय. CSIR-NGRI च्या शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे हा अभ्यास केलाय.ही नदी हिमालयाशी संबंधित असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं ही तिसरी नदी सरस्वती (Saraswati River) असू शकते.या संगमला 3 नद्यांचं मिलन असंही म्हणतात, परंतु सध्या सरस्वती नदी वैज्ञानिकदृष्ट्या कोरडी पडलीय. अशा स्थितीत संगमाच्या खाली तिसरी नदी सापडणं आश्चर्यकारक मानलं जातंय.वास्तविक, हा शोध अनपेक्षितपणे लागला. कारण, शास्त्रज्ञ पाणी शोधण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्वेक्षण (Electromagnetic Survey) करत होते, जेणेकरून जमिनीखाली असलेलं पाणी शोधून त्याचा पिण्याचे पाणी, शेती आणि इतर गरजांसाठी वापर करता येईल.यासाठी सीएसआयआर-एनजीआरआयच्या शास्त्रज्ञांनी हेलिकॉप्टरवर ड्युअल मोमेंट ट्रान्सिएंट इलेक्ट्रोमॅग्नेटिक (टीईएम) तंत्रज्ञान बसवलं आणि त्याच्या मदतीनं गंगा-यमुना (Ganga River) नदीचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक मॅपिंग केलं. त्यात ही बाब समोर आली.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.