'अंटार्क्टिका' हा जगातील सर्वात थंड असा खंड आहे. हा खंड पूर्णपणे बर्फानं झाकला असून यामुळेच येथे लोकवस्ती आढळत नाही. अंटार्क्टिकामध्ये केवळ शास्त्रज्ञांनी संशोधन केंद्रं बांधली आहेत. या लेखाव्दारे आम्ही तुम्हाला या सुंदर खंडाविषयी रंजक अशी माहिती देत आहोत..
एका संशोधनात असं समोर आलंय, की अंटार्क्टिकामध्ये लाखो वर्षांपूर्वी जंगल होतं. 90 दशलक्ष वर्षांपूर्वी संशोधकांना दक्षिण ध्रुवाजवळ एक पर्जन्यवन सापडलं. या निष्कर्षावरून त्यावेळचे हवामान खूप उष्ण आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त होतं, असं आढळून आलंय.इम्पीरियल कॉलेज लंडन आणि इतर संस्थांच्या शास्त्रज्ञांनी दक्षिण ध्रुवाच्या 900 किलोमीटर अंतरावरील जंगलातील माती शोधून काढलीय. जी 145 दशलक्ष ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वीची आहे.'नेचर' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, या मातीपासून परागकण आणि बीजाणूंचे विश्लेषण केले गेले आहे. 'अंटार्क्टिका' हे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. समुद्रपर्यटना व्यतिरिक्त, आपण इथं बरंच काही करू शकता. जे आपल्यासाठी आयुष्यभर संस्मरणीय असेल. अंटार्क्टिकात समुद्रकिनाऱ्यांवर कायाकिंग (नौकाविहार) व्यतिरिक्त आपण डायव्हिंग, सर्व्हिंग सारख्या साहसी खेळांचा एक भाग होऊ शकता.जर तुम्हाला साहसी खेळ आणि गिर्यारोहणाची आवड असेल, तर तुम्ही अंटार्क्टिकामध्येही हा छंद पूर्ण करू शकता. मात्र, तुम्हाला इथं काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.उत्तर अंटार्क्टिकामध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक तापमान 18.3 डिग्री सेल्सियस नोंदवले गेलेय. वातावरणातील बदलामुळं अंटार्क्टिकामधील हिमनद्या अनेक पटींनी वेगानं वितळत आहेत आणि इथं सरोवरे तयार होत आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.