चलनवाढ आणि सध्या सुरू असलेल्या पुरवठा साखळी समस्यांमुळे, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती जवळपास सर्वत्र वाढत आहेत. त्यामुळे १ एप्रिल २०२२ पासून अनेक वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. या वाढलेल्या किमतीचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. परिणामी महागाई वाढण्याची शक्यता आहे. कोणत्या गोष्टी १ एप्रिलपासून महागणार आहेत ते बघूया.
१) खाद्यपदार्थ - किराणा दुकानातील खरेदी ही आता बजेटमध्ये बसणारी नसेल. अंडी, मांस आणि दूध यांसारखे मुख्य पदार्थ महाग होणार आहेतच पण, पुरवठा-साखळी आणि कामगार समस्यांमुळे कोका-कोला आणि पेप्सिकोनेही किमती वाढवण्याची घोषणा केली. ओरियो कुकीज, रिट्झ क्रॅकर्स आणि सॉर पॅच किड्स 2022 मध्ये अधिक महाग होतील.२) कपडे - अनेक दुकानदार त्यांच्या साथीच्या काळातील वॉर्डरोब्स रिफ्रेश करत आहेत. मात्र पुरवठा साखळीच्या दबावामुळे किरकोळ किमती सरासरी 3.2 टक्क्याने वाढतील, असे मॅकिन्से बिझनेस ऑफ फॅशनच्या अहवालात म्हटले आहे. तर, 15% फॅशन एक्झिक्युटिव्ह 2022 मध्ये 10% किंवा त्याहून अधिक किंमती वाढवण्याची शक्यता आहे.३) बाहेरचे जेवण- साथीच्या रोगाच्या सुरुवातीपासूनच रेस्टॉरंट्सवर दबाव आहे आणि सध्या सुरू असलेली कर्मचारी आव्हाने लवकरच दूर होणार नाहीत. परिणामी, बहुतेकांना अन्नासाठी अधिक पैसे देऊन कामगारांना आकर्षित करण्यासाठी वेतन वाढवावे लागले आहे त्यामुळे मेनूच्या किमतीही वाढलेल्या आहेत.४) घर खरेदी महागणार - 1 एप्रिल पासून, केंद्र सरकार प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांना कलम 80EEA अंतर्गत कर सवलतीचा लाभ देणे बंद करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्ष 2022-23 पासून ही सुविधा वाढवण्यात आली नाही.५) वाहने- नवीन कारच्या किमती उच्चांकावर आहेत, तर वापरलेल्या कार आणि ट्रकच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे सर्व आर्थिक स्तरातल्या लोकांना याचे परिणाम भोगावे लागणार आहेत.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.