AR Rahman, Sonu Nigam, Gulzar: Indian singers who have won Grammy Awards Google
पंडित रवी शंकर(ज्येष्ठ सतार वादक)
१९६८ मध्ये पंडित रवी शंकर हे ग्रामी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. त्यांच्या 'West Meets East' या अल्बमला हा पुरस्कार मिळाला होता.
झाकीर हुसैन(ज्येष्ठ तबला वादक)
झाकिर हुसैन यांची किर्ती जगभरात आहे. ते एकदा नाहीत तर तब्बल चार वेळा ग्रामी साठी पात्र ठरले आहेत. त्यांनी २००८ मध्ये 'बेस्ट कॉन्टेम्पररी वर्ल्ड म्युझिक अल्बम' साठी ग्रामी पुरस्कार पटकावला होता.
सोनू निगम(Sonu NIgam)(गायक)
बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमला २०१७ मध्ये त्याच्या 'मुबारकन' अल्बमसाठी ग्रामी पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे.झुबिन मेहता (संगित दिग्दर्शक)
झुबिन यांना अनेकदा ग्रामी पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे. १९८१,१९८२,१९९० मध्ये त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या संगीतातील कामगिरीसाठी ग्रामी पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे. ए.आर.रहमान(गायक-संगीतकार)(A.R.Rahman)
२००८ मध्ये गायक-संगीतकार ए.आर.रहमानला दोन वेगवेगळ्या कॅटॅगरीज् साठी ग्रामी पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.