Korean Fashion Tren esakal
फोटोग्राफी

Korean Fashion Trend : कोरियन मुली इतक्या फॅन्सी कशा राहतात, जाणून घ्या सिक्रेट

के पॉप आणि के ड्रामामुळे तशी फॅशन करण्याकडे मुलींचा कल आहे

सकाळ डिजिटल टीम

भारतात कोरियन फूड, के पॉप, आणि के ड्रामा, कोरियन मुलींचं सौंदर्य या सगळ्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. त्यामुळे आता के फॅशन ट्रेंड (Korean Trend) खूप वाढतो आहे. त्यांच्यासारखं जगण्याचा (Lifestyle) आता अनेक तरूण मुलं- मुली प्रयत्न करू लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून आता के-पॉप आणि के ड्रामामुळे त्यांच्यासारखे कपडे घालण्याचा ट्रेंड वाढतो आहे. के-पॉप आणि के-ड्रामा वॉर्डरोबमध्ये रोज घालता येतील असे काही हटके कपडे आहे. ती फॅशन तुम्ही सहज कॅरी करू शकता.

1) ड्रेस ऑव्हर टी (Dress over Tee)- ही कोरियन ड्रेसिंग स्टाईल खूप मोठ्या ट्रेंडिंगमध्ये आहे. टी किंवा ब्लाउजवर कॅमिसोल ड्रेस परिधान करून तुम्ही कॅज्युअल आणि आकर्षक स्टाईलसाठी उत्तम उन्हाळी OOTD घेऊ शकता. यासाठी फक्त तुमच्याकडे असलेला बेसिक सॉलिड टी, तुमचा लेस कॅमिसोल ड्रेस करून परिपूर्ण कोरियन स्टाईलसाठी प्रो व्हा. तुम्ही हे कपडे स्नीकर्सबरोबर घालू शकता.
2) ओव्हरसाईज क्लोथ्स (Oversize clothes) - कोरियन लोकांना सैल आणि मोठ्या आकाराचे कपडे घालणे विशेष आवडते. जर तुम्ही के-पॉपचे चाहते असाल आणि तुम्हाला कोरियन फॅशन ट्रेंड आवडत असेल तर तुम्ही सहज ओव्हरसाईज कपडे वापरू शकाल. कार्डिगन्स, स्वेटर, स्वेटशर्ट असे काही मोठ्या आकारतले कपडे दिसायला फंकी दिसतात. तुम्ही जर कोरियन ट्रेंड फॉलो करत असाल तर असे कपडे नक्की वापरून पाहा.
3) लेयरिंग (Layering) - हिवाळ्यात लेअरिंग ही K- फॅशन स्टार्सची गो-टू स्टाईल आहे, लेअरिंग हा फॅशन ट्रेंड कोरियन लोकांना खूप आवडतो. कपडे मिक्स मॅच करून ते लेयरिंग स्टाईलने वापरण्याकडे त्यांचा कल असतो. हिवाळ्यात तुम्ही मिक्स टेक्श्चर, लांबी, प्रिंट्स, आणि पॅटर्नचे सर्वोत्तम प्रकार असलेले कपडे पाहू शकता. चेक कोट्स आणि गडद रंग त्यांना आवडतो. कपडे मिक्स-मॅच करणे त्यांना आवडते.
4) डिस्ट्रेस्ड जीन्स (Distressed Jeans)- जेव्हा फॅशनचा विचार केला जातो तेव्हा तुम्ही डिस्ट्रेस्ड जीन्सकडे आकर्षित होता. ही जीन्स के फॅशनचा मह्त्वाचा भाग आहे. हवामानानुसार रेट्रो टॉप्स, ओव्हरसाईज कार्डिगन्स आणि टेक्सचर्ड निट मॅच आणि पेअर करूनन ते या जीन्सवर कसे कॅऱी करता येतील हे कोरियन लोकांना माहीत आहे.
5) स्नीकर्स आणि मोजे (Sneakers and Socks) - कोरियन फॅशनमध्ये स्नीकर्स केवळ त्यांच्या सोयीसाठी नाही तर, स्नीकर्स + सॉक्सच्या ट्रेंडमध्येही लोकप्रिय आहेत. स्नीकर्स आणि सॉक्स हे कोरियामधील सर्वात लोकप्रिय फॅशन आहे. अनेक मुली ही फॅशन अगदी आवडीने फॉलो करतात. घोट्याच्या लांबीचे (Ankle length) मोजे किंवा काल्फ लेन्थ (calf-length socks मोजे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नसतात, तर ते कपडे आणि स्कर्टसह ते फ्लॉंन्ट (flaunt) अर्थात दाखवले जातात.
6) छोटेसे दागिने (Mini Accessories)- कोरियन फॅशन दागिन्यांशिवाय (accessories) पूर्णच होऊ शकत नाही. यात तुम्हाला हेअर अॅक्सेसरीज, मजेदार ब्रोचेस, नेकपीस आणि एव्हिएटर-फ्रेम केलेले सनग्लासेस हा ट्रेंड खूप पाहायला मिळेल. तो तुम्हाला प्रत्येक कोरियन मार्केटमध्ये सापडेल. जर तुम्ही कोरियन फॅशन हँडबुकवर एक नजर टाकली तर तुम्हाला याचा सहज संबंध लक्षात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT