केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक विकास मंत्रालयाने हस्त कारागिरांसाठी मुंबईत आयोजित केलेल्या हुनर हाटला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहेत. देशभरातील १ हजारपेक्षा अधिक हस्त कारागिरांनी या ‘हुनर हाट’ मध्ये सहभाग घेतला आहे.
आपल्या कुटुंबियांसाठी किंवा मित्रमंडळींसाठी काहीतरी विशेष भेटवस्तू खरेदी करायची असल्यास आता कुठेही दूर जाण्याची गरज नाही. कारण अल्पसंख्यांक विकास विभागाने वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानात भरवलेल्या हुनर हाटमध्ये आकर्षक भेटवस्तू सहज मिळू शकतात. भेटवस्तूच नाहीत तर देशभरातील खाद्यसंस्कृतीचा अनुभव येथे घेता येणार आहे. विविध राज्यांतील खाद्यपदार्थांचे एकूण ६० स्टॉल येथे लावण्यात आले आहेत. विविध राज्यांतील हस्तकलाकार या हुनर हाटमध्ये सहभागी झाले आहेत. कारागिरांच्या कौशल्याचा कस लावणाऱ्या आकर्षक आणि कलात्मक वस्तू येथे पाहायला मिळत आहेत. २५हून अधिक सर्कस कलाकारांचे सादरीकरण हुनर हाटमध्ये सुरू आहे. लहान मुलांना तर ही सर्कस आवडेलच पण मोठ्या माणसांमधील लहान मुलही या निमित्ताने जागे होईल. आकर्षक वस्तू, खाद्यपदार्थ, सर्कस यांचा मेळ असलेल्या या मेळाव्यात सांगीतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.