कोल्हापूर : पंढरीचा (Pandharpur)वारकरी, वारी चुकू दे ना हरी.....अशी सावळ्या विठुरायाला आर्त साद घातल दरवर्षी जाता पंढीरीशा....सुख वाटे जीवा... अशीच मनी भावना ठेवत लाखो वारकऱ्यांचा जथ्था पंढरपुरच्या दिशेने आषाढी पालकी सोहळ्याच्या वारीत चालतो. कोविडच्या (Covid 19 )प्रादूर्भावाने सलग दुसऱ्या वर्षी यंदाही पालखी सोहळा झालेला नाही. देहूतून जगदगुरू संत तुकाराम महाराज व आळंदीतून (Aalandi) प्रस्थान ठेवणारा संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय पालखी सोहळा म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. मात्र दोन वर्षापासून महाराष्ट्रचे चालतं बोलतं वैभव पाहण्याचे भाग्य कोणालाच लाभलेलं नाही.
देशातच नव्हे तर परदेशातही पालखी सोहळ्याची भुरळ आहे. आकर्षण आहे. प्रत्यक्ष वारी सोहळ्याची अनुभूती येत नसली तरी सकाळने छायाचित्रांव्दारे ती अनुभूती उपलब्ध करून दिली आहे. त्याची सचित्र झलक. महाराष्ट्र आणि देशातील वारकऱ्यांना विठ्ठल व वारी याची अनुभूती यावी यासाठी ही सर्व छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद केली आहेत सकाळचे पेजीनेशन चे आर्टिस्ट प्रकाश पाटील यांनी. यांच्या अनेक छायाचित्रांचे प्रदर्शन सकाळच्या वतीने भरवण्यात आले होते.
पाऊले चालती पंढरीची वाट:
पालखी सोहळा म्हणजे स्वतंत्र परंपरा, गर्दी असली तरी दाटीवाटी नसते. त्या गर्दीतही असतो निटनिटकेपणा, त्यात लाखो वारकऱ्यांच्या जथ्याला ओढ असते, सावळ्या विठुरायाच्या दर्शनाचीच.माझे माहेर पंढरी:
अशीच काही भावना घेवून अबालवृद्धांना सावळ्या विठुरायाची ओढीने चालतात. वाटेत विसाव्यालाही विठुरायाची ओढ कायम असते. अशाच एका मुक्कामच्या ठिकामी विठुरायाच्या मूर्तीसमोर त्याच्याच नामस्मरणात तल्लीन झालेला बाल वारकरी म्हणजे त्याचेच प्रती विठ्ठलच म्हणावा असाच आहे. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा:
असाच अऩुभव पालखी सोहळ्यात येतो. पालकीत चालताना पायांना थकवा नसतोच. शरीरही थकत नाही मनही दमत नाही. तेथे असते ती केवळ आंतरिक ओढ तीही विठुरायाच्या दर्शनाचीच वारी म्हणजे गजबजलेलं गाव असतं. त्याचे नियम वेगळे, त्यांचा शिरस्तही वेगळाच. वारीच्या वाटेवरील प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी असं गाव सायंकाळी वसतं अन् दुसऱ्या दिवशी स्थलांतरीतही होत. तेच गाव नेहमीच्या गावाहूनही वेगळं असतं. राहुट्यात सार सामवलेल्या गावाच मन विशाल असतं. ज्ञानबो तुकाराम... ज्ञानबो तुकाराम... सावळ्या विठुरायाच्या भेटीला निघालेल्या संत तुकोबाराय व ज्ञानोबारायांच्या पादुकांचे दर्शन हीच खरी ताकद आहे. हरीनामाचा गजर कानावर पडतो त्यावेळी पालखी सोहळाच आठवतो. त्याच पालखी सोहळ्यातील तुकोबाराय, ज्ञानोबारायांच्या पादुकांच्या दर्शनाला लाखोंची गर्दी उसळते. त्याच ह्या पादुका.जिथ जागा मिळेल तिथ हरीनामाचा जपं अन् मुखात विठुरायाचीच ओढ असते. त्याच ओढीने निघालेल्या वारकऱ्यांना जस जमल तसं. अन जिथं जमलं तिथं भजनासह नामस्मरणाचीच सवय लागते. अशाच एका विसाव्याच्या ठिकाणी त्याच अंतरिक ओढीनेचं पांडुरंगाची. नादभ्रम रंली अन् त्याच वेळी पांडुरंगाचा स्मरणाचाही नाचही
पालखी सोहळ्याच्या विसाव्यासह मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी वेगवेगळ्या खेळात दंग असतात. रिंगण सोहळ्यातही अनेक खेळ होता
त. त्या खेळाच्या रूपात ते भक्तीतही न्हाऊन निघतात. पालखी सोहळ्याच्या विसाव्यासह मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी वेगवेगळ्या खेळात दंग असतात. रिंगण सोहळ्यातही अनेक खेळ होतात. त्या खेळाच्या रूपात ते भक्तीतही न्हाऊन निघतात. वारकऱ्यांची परंपरा म्हणेज भागवती पताका: कधी ती डौलाने झळकते असेत तीच पताका पालखी सोहळतही वारकऱ्यांच्या खांद्यावर तितक्याच डोलात असते. ती भागवती पताका, त्याच डौलाने खांद्यावर मिरवत अखंड चालणारा थकला भागला तरी मनातील विठुरायाची ओढ कमी होत नाही.पंढरीशी जाईन:असा मनी भाव घेवून जनाई, संत संखूही पंढरीच्या वाटेवर निघाल्या होत्या. त्यांना ओढ होती, विठुरायाची आजही पालखी सोहळ्याच लाखो वारकऱ्यांत महिला वारकरीही सावळ्या विठुरायाच्या ओढीने जाणाऱ्या तितक्याच तल्लीनतेने सहभागी असतात. मुक्कामाच्या ठिकाणी सार काम केल्यानंतर त्या महिला पुन्हा दिंडीत चालतात. त्यांना कंटाळा हा नसतोच.अवघाची झाला विठ्ठल:
अशीच अनुभूती देणारा पालखी सोहळा. अन् रिंगण सोहळा म्हणजे त्या सोहळ्यातील प्राण. वारकऱ्यांना ताकद देणारा क्षण. रिंगण सोहळा रंगला याच रिंगण सोहळ्यात भागवती पताका घेऊन धावणारे अबालवृद्ध वारकरी.चंद्रभागेच्या तिरी:
उभा पंढरी..तो पहा विटेवरी.... अशीच काहीशी भावना मनात गेवून आषाढीच्या दिवशी चंद्रभागेत स्नान करण्यासाटी असंख्य गर्दी असते. ती नेत्रदिपक गर्दी म्हणेज सावळ्या विठुरायाच्या ओढीने आलेल्या भक्तांचा जथ्था. अवघा झालासे विठ्ठल:
रिंगण सोहळा म्हणजे पालखी सोहळ्याचा प्राण. वारकऱ्यांच्या अंगात बळ देणारा क्षण. या रिंगण सोहळ्यात धावणारे अश्व डोळ्यात साठविण्यासाठी जमलेला जनसमुदाय.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.