Ashok Saraf Interesting facts about the actor king of comedy esakal
Ashok Saraf - मराठी - हिंदी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेते विनोदाचे बादशहा अशोक सराफ चाहत्य़ांच्या नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या (marathi hindi cinema) वेगवेगळ्या मुलाखती सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. अशोक सराफ हे मराठी चित्रपट विश्वात अशोक (Marathi movie) मामा या नावानं प्रसिद्ध आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्तानं आपण त्यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून (Marathi Entertainment) घेणार आहोत. आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं अशोक सराफ यांनी नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रंगभूमीवरही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या अशोक मामांना प्रेक्षकांकडून अमाप लोकप्रियता मिळाली. अभिनयातील वेगवेगळे पुरस्कारही अशोक सराफ यांना मिळाले आहेत.एक डाव भुताचा, धुमधडाका, गंमत जंमत, अशीही बनवाबनवी, बिनकामाचा नवरा, एक गाव बारा भानगडी, पांडु हवालदार यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. याशिवाय त्यांनी करण अर्जुन, येस बॉस या हिंदी चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या होत्या.
विनोदी भूमिका ही अशोक सराफ यांची मुख्य ओळख. याशिवाय काही चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या गंभीर भूमिकाही प्रेक्षकांची दाद मिळवून गेल्या. प्रभावी हावभाव, लक्ष वेधून घेणारी संवादफेक, यामुळे अशोक मामांचा अभिनय नेहमीच प्रेक्षकांना हवाहवासा वाटला. आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं अशोक सराफ यांनी नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.एक डाव भुताचा, धुमधडाका, गंमत जंमत, अशीही बनवाबनवी, बिनकामाचा नवरा, एक गाव बारा भानगडी, पांडु हवालदार यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. याशिवाय त्यांनी करण अर्जुन, येस बॉस या हिंदी चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या होत्या. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी वि वा शिरवाडकर यांच्या ययाती आणि देवयानी या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं. जानकी या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपट क्षेत्रात उडी घेतली. 1980 ते 1990 च्या दशकांत अशोक सराफ यांनी एका पेक्षा एक सरस चित्रपट केले. ते प्रेक्षकांना कमालीचे आवडले. 4 जुन 1947 बेळगाव या गावी अशोक मामांचा जन्म झाला. त्यांचे लहानपण मुंबईतील चिखलवाडीत गेले. त्यांचं शिक्षण मुंबईतल्या डीजीटी विद्यालयात झालं. अशोक सराफ यांनी निवेदिता सराफ यांच्याशी लग्न केलं. त्या अशोक सराफ यांच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान आहेत. 1969 मध्ये अशोक सराफ यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं. त्यांनी 250 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यापैकी 100 चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाले. मराठी चित्रपट विश्वामध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर यांची जोडी नेहमीच प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय होती. त्यांना प्रचंड प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळाला. विनोदी चित्रपटांची मोठी लाट या कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लोकप्रिय केली होती. आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीनं अशोक सराफ यांनी नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रंगभूमीवरही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या अशोक मामांना प्रेक्षकांकडून अमाप लोकप्रियता मिळाली. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.