आसाममध्ये पुरामुळं झालेल्या विध्वंसात राज्यातील 18 लाख लोक बाधित झाले असून आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झालाय.
आसाममध्ये पुरामुळं झालेल्या विध्वंसात राज्यातील 18 लाख लोक बाधित झाले असून आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झालाय. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं (Assam State Disaster Management Authority-ASDMA) ही माहिती दिलीय.आसाममधील दारांग जिल्ह्यातील सिपाझार भागात राष्ट्रीय महामार्ग 15 वर (National Highways) पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे.पुराच्या पार्श्वभूमीवर दारांग जिल्हा (Darrang District) प्रशासनानं महामार्गावरील सर्व वाहने बंद केली आहेत. यानंतर राष्ट्रीय महामार्गावर शेकडो ट्रक अडकून आहेत.आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं (ASDMA) माहिती दिलीय की, राज्यातील 28 जिल्ह्यांना पुराचा फटका बसलाय. या जिल्ह्यांमध्ये 18.94 लाख बाधित झाले आहेत.आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळं गुवाहाटीच्या विविध भागात पाणी साचलंय.आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांना आसाममधील पूरस्थितीची माहिती घेण्यासाठी फोन केला. या नैसर्गिक आपत्तीमुळं लोकांना होत असलेल्या अडचणींबद्दल चिंता व्यक्त करत मोदींनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.