राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल समाधी स्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज तिसरा स्मृतीदिन आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल समाधी स्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं की, त्यांच्यासारखा नेता मिळाल्यानं भारतीय राजकारण कृतार्थ झाले. अटलजींचे व्यक्तिमत्व, त्यांचा स्वभाव, समजूतदारपणा आणि हजरजबाबीपणा नेहमीच लक्षात राहतो. देशाच्या प्रगतीमध्ये त्यांच्या योगदानाचे स्मरण करतो. अटलजी देशवासियांच्या हृदयात राहतात असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.अमित शहा यांनी ट्विटरवर म्हटलं की, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा देशाला वैभवाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी होता. त्यांच्यासारखे बहुआयामी व्यक्तिमत्व असेलला नेता मिळाल्यानं भारतीय राजकारण धन्य झाले. त्यांची मूल्ये आणि आदर्श आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी एक अमूल्य असा वारसा आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांनी 2005 मध्ये सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर 2009 मध्ये त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते फारसे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हते. 2018 मध्ये त्यांची प्रकृती जास्तच खालावली. 16 ऑगस्ट 2018 रोजी एम्समध्ये उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वाजयेपी यांनी तीनवेळा भारताचे पंतप्रधानपद भूषवले होते. यात पहिल्यांदा 1996 मध्ये 13 दिवसांसाठी पंतप्रधान होते. तर 1998 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार 13 महिन्यात कोसळले. त्यानंतर मात्र तिसऱ्या वेळी 1999 ला पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या सरकराने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.