Udayanraje Bhosale esakal
सध्या नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने सातारा शहरातील विकासकामांचा श्रेयवाद उफाळून आलाय.
सातारा : सध्या सातारा नगरपालिकेची निवडणूक (Satara Municipal Election) जवळ आल्याने सातारा शहरातील विकासकामांचा श्रेयवाद उफाळून आला आहे.खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी पोवई नाक्यावर 'गतिमान विकासासाठी सातारा विकास आघाडी' CRF निधीतून पोवई नाका ते वाढे फाटा या 15 कोटीच्या मार्गाचा शुभारंभ 22 तारखेला घेणार असल्याचे बॅनर लावले.या त्यांच्या बॅनरला प्रतिउत्तर म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांच्या नगरविकास आघाडीने त्याच्या बाजूलाच थेट बॅनर लावत काम कुणाचं आणि नाचतंय कोण? असा प्रश्न विचारत कधी तरी खरं बोला असा बॅनर लावला आहे.आणि विशेष म्हणजे, या बॅनरवर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार हे काम नितीन गडकरी यांनी मंजूर केल्याचे पत्रच या बॅनरवर छापले आहे, त्यामुळे त्यामुळे आता हा बॅनर बघण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागलीय.मात्र, या दोन्ही बॅनरवर सातारा पालिकेने कारवाई करत हे बॅनर हटवण्यास सुरुवात केलीय. एकंदरीत, आत्तापासूनच साताऱ्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालीय हे नक्की.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.