गाेव्यातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. येथील सागरी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी वेगवेगळ्या बीचला भेट देतात.
दक्षिण गाेवा येथे पालाेलेम बीच आहे. येथील निसर्ग साैंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असती.गाेव्यात येणा-या पर्यटकांच्या आवडते ठिकाण म्हणजे बागा बीच. या बीचवर गाेव्याची संस्कृती पाहयला मिळते.ब्रिटिश पर्यटकांचे सर्वाधिक आवडते कॅंडाेलिम बीच आहे. सर्वाधिक सुटीचा काळ ते या ठिकाणी घालविण्यासाठी येतात. या बीचवर सुमद्राच्या लाटा इतर ठिकाणांपेक्षा वेगवान असतात.मासे पकडण्यासाठी तुम्ही बैनाेलिम बीचची निवड करु शकताे. या ठिकाणी गाेव्याच्या साैंदर्या बराेबरच तुम्हांला येथील समुद्रात तुम्हांला सर्वाधिक मासे मिळतील.पणजीपासून तीन किलाेमीटर अंतरावर मीरामार बीच आहे. येथून मांडवी नदी अरबी समुद्राला मिळते. हे मिलन डाेळ्यांचे पारणे फेडते. डबाेलिम विमानतळापासून 16 किलाेमीटर अंतरावर अराेसिम बीच आहे. गाेव्यातील समुद्रांपैकी एक स्वच्छ निळ्या पाण्यांनी घेरलेले बीच म्हणून याची आेळख आहे.मडगावहून पाच किलाेमीटर अंतरावर काेल्वा बीच आहे. येथील पांढ-या शुभ्र मातीत व्हाॅलीबाॅल खेळण्यास खूप मजा येते. नारळ्याच्या आकाराचे हे बीच आहे.समुद्र तळावरची राणी म्हणून कलंगुट बीचला संबाेधिले जाते. हे बीच सर्वाधिक सुंदर असून पर्यटकांना येथे जास्ती जास्त वेळ फिरण्यास आवडते. मासे पकडण्यासाठी बाेममालाे बीचवर मच्छिमारांची गर्दी असते. हे बीच विमानतळापासून पाच किलाेमीटर अंतरावर आहे. मापसा शहरापासून नऊ किलाेमीटर अंतरावरील सुमद्रावर पांढरी माती येथील साैंदर्यात भर टाकते. कलंगुट आणि बागा बीचच्या तुलनेत अरम्बाेल बीचला येथे विदेशी पर्यटकांची पसंती असते. या ठिकाणी वाॅटरगेम्स खेळण्यासाठी आनंद लुटता येताे.चापाेरा किल्ल्यानजीक चापाेरा बीच आहे. गाेव्यातील हे एक शांत ठिकाण आहे.दक्षिण गाेव्यात माैज मजा करण्यासाठी माेबाेर बीच हे उत्तम ठिकाण आहे. पार्टी आणि वाॅटर स्पाेर्टससाठी हे बीच प्रसिद्ध आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.