Beautiful temples in Himalaya Sakal
हिमालयाच्या कुशीत वसलेली प्रसिद्ध मंदिरं (Beautiful temples in Himalaya):
हिमालयाच्या सुंदर पर्वतरांगात अनेक मंदिरं आहे. दरवर्षी लाखो भाविक या मंदिरांना भेट देत असतात.आज आपण हिमालयाच्या कुशीत वसलेल्या काही सुंदर मंदिरांची माहिती घेणार आहोत.
1.तुंगनाथ मंदिर, उत्तराखंड (Tungnath Mandir, Uttarakhand)-
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तुंगनाथ मंदिर अतिशय प्रसिद्ध शिव मंदिर आहे. पंच केदार मंदिरांपैकी हे एक महत्त्वाचं मंदिर आहे.2.रुद्रनाथ मंदिर, उत्तराखंड (Rudranath Temple, Uttarakhand)-
उत्तराखंडमधील रुद्रनाथ मंदिर हे पंच केदार मंदिरांपैकी एक असून येथे हजारो भाविक मंदिराला भेट देत असतात.3.नीलकंठ महादेव मंदिर, उत्तराखंड (Neelkanth Mahadev Temple, Uttarakhand)- पौरी गडवाल जिल्ह्यातील हे शिवमंदिर प्रसिद्ध आहे. अनेक भाविक दरवर्षी या मंदिराला भेट देत असतात. 4. मध्यमेश्वर मंदिर (Madhyameshwar Temple)- हिमालयाच्या कुशीत वसलेल्या मान्सूना या ठिकाणी 3497 मीटर उंचीवर वसलेले हे मंदिर प्रसिद्ध शिवमंदिर आहे.5. केदारनाथ मंदिर, उत्तराखंड (Kedarnath Temple, Uttarkhand)- केदारनाथ मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध अशा शिवमंदिरांपैकी
एक आहे. हे मंदिर दरवर्षी एप्रिल-मे च्या दरम्यान भाविकांसाठी खुलं होतं तर ऑक्टोंबरमध्ये बंद होतं.6. यमुनोत्री मंदिर, उत्तराखंड (Yamunotri Temple, Uttarkhand)- यमुना नदीचं उगम यमुनोत्री येथे होतो. 3293 मीटर उंचीवर हे मंदिर वसले आहे. या मंदिराला हजारो भाविक भेट देत असतात..7. कल्पेश्वर मंदिर, उत्तराखंड (Kalpeshwar Temple, Uttarkhand)- पंच केदार मंदिरांपैकी एक असलेलं हे प्रसिद्ध शिव मंदिर आहे. या ठिकाणी ध्यान करण्याचा अनुभव सर्वोत्कृष्ट असतो. 8. हेमकुंड साहिब, उत्तराखंड (Hemkund Sahib, Uttarkhand)- जगातील सर्वात उंचीवरील गुरुद्वारा म्हणून हेमकुंड साहिब ओळखला जातो. 4329 मीटर उंचीवर तो वसलेला आहे. 9. अमरनाथ, जम्मू आणि काश्मिर (Amarnath, Jammu and Kashmir)- जगातील सर्वात प्रसिद्ध असा हिंदू मंदिर म्हणून अमरनाथ मंदिर प्रसिद्ध आहे. हे एक निसर्गाचा चमत्कार मानला जातो. या मंदिरात बर्फाचं शिवलिंग आहे. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.