makeup cosmetic products esakal
महिला त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी विविध मेकअप प्रॉडक्टस वापरतात. मेकअप प्रॉडक्टस वापरताना त्याची काळजी घेणे ही तितकेच महत्वाचे आहे जितके त्यांच्या स्टोरेजवर फोकस करणे. मेकअप प्रॉडक्टस योग्य प्रकारे ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जर मेकअप प्रॉडक्टसची योग्य काळजी घेतली गेली नाही तर ते खराब होऊ शकतात. ब्युटी प्रॉडक्टसचा वापर करण्याबरोबरच, ते कुठे स्टोर करायचे हे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते खराब होणार नाहीत. साधारणपणे महिलांना त्यांची ब्युटी प्रॉडक्टस बाथरूममध्ये ठेवणे आवडते, परंतु येथे ब्युटी प्रॉडक्टस ठेवणे सुरक्षित नाही. हे प्रॉडक्टस कुठेही ठेवले तर ते खराब होऊ शकते. जर ब्युटी प्रॉडक्टस योग्यरित्या स्टोर केले गेले तर ते त्यांचे शेल्फ लाइफ वाढवते, परंतु ते चेहऱ्यावर लावल्यानंतर तुम्हाला फ्लॉलेस लुक देते. अशी अनेक ब्युटी प्रॉडक्टस आहेत, जी फ्रीजमध्ये ठेवावीत. आपण त्या ब्युटी प्रॉडक्ट्स बद्दल जाणून घेऊया ज्या फ्रिजमध्ये ठेवल्या पाहिजेत.
परफ्यूम: परफ्यूम नेहमी फ्रीजमध्ये ठेवावे. उच्च तापमानात परफ्यूम खराब होऊ शकतो. परफ्यूम नेहमी हीट आणि लाइटपासून दूर ठेवले पाहिजे.लिपस्टिक: फ्रिजमध्ये लिपस्टिक स्टोर करुन ठेवल्याने ते जास्त दिवस खराब होत नाहीत. लिपस्टिक फ्रीजमध्ये ठेवता येते, कारण जास्त तापमानात लिपस्टिक खराब होऊ शकते. तुम्ही दररोज वापरत असलेली लिपस्टिक तुमच्या बॅगमध्ये ठेवू शकता, पण स्पेशल व्होकेजनवेळी तुम्ही तुमच्या ब्युटी प्रॉडक्टसच्या बॅगमध्ये ठेवलेली लिपस्टिक फ्रीजमध्ये ठेवा. असे न केल्यास तुमच्या लिपस्टिकचा रंग बदलू शकतो. त्याच वेळी, जर लिपस्टिक एका उबदार ठिकाणी ठेवली असेल तर ती वितळण्याची भीती आहे, म्हणून ती रेफ्रिजरेटरमध्ये सुरक्षितपणे ठेवता येते.आय क्रीम: आय क्रिम डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी वापरली जाते. आय क्रिम देखील एक आरामदायक प्रभाव देतात. सौंदर्य तज्ञांच्या मते, डोळ्याची क्रिम फ्रीजमध्ये ठेवली पाहिजे, यामुळे डोळ्यांच्या क्रिमची ताकद आणि प्रभाव वाढतो तसेच डोळे थंड राहतात.अॅलोवेरा जेल: जर अॅलोवेरा जेल रुम टेम्परेचरवर ठेवले तर ते खराब होऊ शकते, म्हणून ते सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. तसेच, त्वचेची जळजळ, मुरुमांसाठी अॅलोवेरा जेलपेक्षा चांगला पर्याय नाही. यासह, खाज आणि जळजळ कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे, परंतु बऱ्याचदा लोक त्यांना रुम टेम्परेचरवर ठेवतात, जे चुकीचे आहे. अॅलोवेरा जर तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला तरच ते फायदेशीर ठरेल, मग ते मार्केटमधील असो किंवा नॅचरल.टोनर: फ्रीजमध्ये ठेवलेले टोनर लावल्याने त्वचेला एक वेगळाच ताजेपणा मिळतो. टोनर ठेवण्यासाठी फ्रीज हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
सनस्क्रीन लोशन: जर तुमची सनस्क्रीन बॉटल उन्हाळा संपल्यानंतरही भरलेली असेल तर तुम्ही ती सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. ती बाहेर ठेवल्याने त्याच्या एस.पी.एफची गुणवत्ता आणि परिणामकारकता प्रभावित होते, त्यामुळे त्याचा वापर केल्याने योग्य प्रतिकारशक्ती मिळत नाही.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.