Benefits of Eating Raisins: Sakal
Benefits of Eating Raisins: मनुका या सुक्या मेव्याचं सेवन शक्यतो थंडीच्या दिवसात केलं जाते. त्यामुळे शरीरात गरमी राखली जाते. परंतु त्याचा अर्थ असा अजिबात नाही, मनुक्याचं सेवन उन्हाळ्याच्या दिवसात करून नये. आज आपण मनुक्याचे फायदे पाहणार आहोत.
जर मनुके रात्री पाण्यात भिजवून सकाळी उठून उपाशीपोटी खाल्ल्यास त्यामुळे शरीराला खूप सारे फायदे होतात. भिजवलेले मनुके सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने शरीराला खूप सारे फायदे होतात. मनुक्यांमध्ये फायटोकेमिकल्स आढळतात. ज्यामुळे दातांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
मनुक्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आढळतात. सकाळी उपाशीपोटी मनुक्यांचे सेवन केल्याने 'कफ'ची समस्या दूर होते. मनुक्यात आढळणाऱ्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोज वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
मनुक्यातील विटामिन सी आणि लोहामुळे केसगळती रोखण्यासाठी तसेच त्यांवर चमक येण्यासाठीही फायदा होतो. मनुक्यात विटामिन ए, बीटा कॅरोटीन आणि एंटी-ऑक्सिडंट गुण असतात. त्यामुळे डोळ्यांना कमजोरी दूर होण्यासाठी मदत होते. परंतु मनुक्याचं अधिक प्रमाणात सेवन केल्याने शरीरात कॅलरी वाढून वजनही वाढू शकते. तसेच उलटी, जुलाब तसेच फॅटी लीव्हरची समस्या होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.