Benefits of Travel Insurance Esakal
ट्रॅव्हल इन्शुरन्सचे फायदे (Benefits of Travel Insurance):
अनेक लोकांना फिरायची (Travelling) भारी हौस असते. जगभरात फिरावं, नवनवीन गोष्टी अनुभवाव्या असे अनेकांना वाटते. या आवडीपोटी कुणी जगभरातले वेगवेगळे देश फिरते, तर कुणी वेगवेगळे पर्वत सर करायच्या मोहिमेवर जातं. परंतु यादरम्यान आपल्याला अनेक दुर्दैवी घटनांना सामोरे जावं लागू शकते. खासकरून गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कहर माजवणाऱ्या कोरोनाच्या काळात (Corona Pandemic) आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. याच काळजीचा भाग म्हणून ज्यांना फिरायची आवड आहे, त्यांनी ट्रॅव्हल इन्शुरन्स जरूर काढावा. त्यामुळे कोरोना तसेच इतर कोणत्याही दुर्घटनेवेळी मदत होऊ शकते.
1. विशेष यात्रेपूर्वी तुम्ही जर ट्रॅव्हल इन्शुरन्स काढला तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. त्याद्वारे तुम्हाला हेल्थ केअरची (Health Care Service) सुविधा मिळू शकते.2. ट्रॅव्हल इन्शुरन्समुळे तुम्हाला कोणत्याही मेडीकल इमर्जेन्सीवेळी (Medical Emergency) मोठ्या खर्च होण्यापासून वाचता येतं.3. एखाद्या आजाराव्यतिरिक्त ट्रॅव्हल इन्शुरन्समुळे एखाद्या यात्रेदरम्यान अपघात (Accodent) अथवा दुर्घटनेदरम्यान होणाऱ्या खर्चही (claim) मिळू शकतो.4. जर तुम्ही विमानानं प्रवास (Travel by plane) करत असाल तर विशिष्ट परिस्थितीत तुम्हाला रिस्क कव्हरसुद्धा मिळू शकतो. खास करून विमानाला उशिर झाल्यास तुम्ही प्रतितासाच्या हिशोबाने क्लेम करू शकता. 5. कधी कधी विमान हायजॅक (Hijack) होण्याच्या घटनाही घडतात. अशावेळीही तुम्हाला क्लेम मिळू शकतो.6.ट्रॅव्हल इन्शुरन्सअंतर्गत एखादी ट्रिप कॅन्सल झाल्यास तिकीटाचा खर्च, हॉटेल बुकींगमध्ये रिफंड मिळू शकतो. (Refund)7. एखाद्या यात्रेदरम्यान तुमचं सामान तसेच जरूरी कागदपत्रे हरवली (Documents lost) तरीही तुम्हाला इन्शुरन्स क्लेम (Insurance claim) मिळू शकतो. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.