Best Place To Visit In Bihar : बिहार हे असं पर्यटन स्थळ आहे, ज्याचा इतिहास भारताच्या सुवर्णकाळाशी निगडीत आहे. तुम्ही कधी बिहारला गेलात, तर या राज्यातील कोणती शहरे भेट देण्यास खास आहेत हे आपण बघणार आहोत.
नालंदा हे जगातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. याची स्थापना 5 व्या शतकात गुप्त वंशाचा शासक सम्राट कुमारगुप्त यानं केली आणि महेंद्रादित्य ही पदवी धारण केली. हे विद्यापीठ सध्या बिहार राज्याच्या दक्षिण-पूर्वेस 88.5 किमी अंतरावर आणि राजगीरच्या उत्तरेस 11.5 किमी अंतरावर पाटणातील एका गावाजवळ आहे. असं म्हणतात, की जैन तीर्थंकर महावीर यांनी येथे 14 पावसाळे घालवले होते. या शिक्षण केंद्राची कीर्ती एवढी होती की, ह्वेन त्सांग या चिनी प्रवाशानं इथं भेट देऊन किमान दोन वर्षे वास्तव्य केलं होतं. गंगेच्या दक्षिणेकडील बिहारची राजधानी पाटणा.. ही प्राचीन भारतात पाटलीपुत्र म्हणून ओळखली जायची. हे शहर जगातील सर्वात प्राचीन वस्ती असलेल्या शहरांपैकी एक मानलं जातं. इथं शीख धर्मस्थळ पाटणा साहिब गुरुद्वार आहे, जिथं शेवटचे शीख गुरू गुरु गोविंद सिंह यांचा जन्म झाला होता. हरियांका, नंदा, मौर्य, शुंग, गुप्त आणि पाल यांच्या काळात हे शहर भारतभर खूप लोकप्रिय होतं.प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असलेलं बोधगया, हे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. पण, हे बौद्ध तीर्थक्षेत्रांसाठी एक संक्रमण बिंदू आहे. इथं एका झाडाखाली बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली होती, असं म्हणतात. गया हे फाल्गू नदीच्या काठावर वसलेलं एक शहर आहे. मौर्य आणि गुप्त राजवटींच्या यशस्वी वाटचालीत इथं बांधलेली अनेक मंदिरं आणि ऐतिहासिक स्थळं आजही जशीच्या तशी आहेत.मध्य बिहारमधील धार्मिक आणि पर्यटन स्थळांपैकी एक राजगीर.. त्याच्या नैसर्गिक परिसरासाठी व बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मातील आध्यात्मिकतेसाठी प्रसिद्ध आहे. 'देवांचं निवासस्थान' म्हणून ओळखलं जाणारं राजगीर हे सुमारे 3000 वर्षे जुनं शहर आहे. राजगीर दोन विभागांमध्ये विभागलं गेलंय.पुरातत्व स्थळ वैशाली ही एकेकाळी लिच्छवी शासकांची राजधानी होती. वैशाली हे शेवटचे जैन तीर्थंकर भगवान महावीर यांचं जन्मस्थान आहे. वैशाली प्रजासत्ताकातील कुंडलग्राम येथे महावीरांचा जन्म आणि पालनपोषण इसवी सन पूर्व सहाव्या शतकात झाल्याचं सांगितलं जातं. इथं तुम्हाला अजूनही स्तूप, कुटागरशाळा विहार, राज्याभिषेक टाकी, जागतिक शांतता पॅगोडा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संग्रहालय, बावन पोखर मंदिर, कुंडलपूर, राजा विशालचा किल्ला, चौमुखी महादेव इत्यादींचे अवशेष पाहायला मिळतात.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.