गड किल्ल्यांची ओढ आपल्या सर्वांनाच आहे. गड किल्यांनी समृध्द असा परिसर पुण्याच्या आसपास आहे. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सिंहगडपासून, एका दिवासमध्ये ट्रेक करता येईल असे गड पुण्याच्या आसपास आहेत. पावसाळा असो, हिवाळा असो की उन्हाळा केव्हाही तुम्ही भेट देऊ शकता असे हे गड आहेत. ट्रेकर्ससाठी आकर्षण ठरणारे पुण्याजवळील अशाच किल्ल्यांची माहिती तुम्हाला सांगणार आहोत.
राजमाची
पुण्यातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारा लोणावळा आणि खंडाळाच्या परिसरामध्ये वसलेला राजमाची किल्ला. राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग कोंडीवडे गावातून जाणारा असून चढाई करण्यासाठी अवघड आहे. सुमारे २००० फुट चढाई तुम्हाला करावी लागेल. दुसरा मार्गा लोणवळ्यापासून जात असून सोपा आहे एक साधी पायवाट आहे. राजमाचीचे खरे सौंदर्य पावसाळ्यात दिसते.
लोहगड
पुण्यापासून ५२ किमी अंतरावर आणि लोणावळा हिलस्टेशन पासून २० किमी अंतरावर एका सुंदर टेकडीवर लोहगड किल्ला वसलेला आहे. लोहगड किल्ल्यासोबत शेजारच्या विसापूर किल्ल्यालाही ट्रेकर्स भेट देतात. लोहगड किल्ल्यावर जाण्याचे दोन मार्ग आहे आहे एक म्हणजे मळवली स्टेशनवरुन पायऱ्यांच्या पायथ्यांकडे भाजे लेण्यांकडे आणि नंतर लोहगडवाडी गावाकडील मार्ग. दुसरी मार्ग लोणावळा बस स्टॅन्डवरून शेअर टॅक्सी मिळवणे. ट्रेकिंगला सुरवात करणाऱ्यासांठी हा परफेक्ट स्पॉट आहे. विसापूर किल्ला
विसापुर किल्ला हा लोहगडच्या शेजारी आहे. लोणावळ्यतील मावळ तालुक्याच्या पुर्वेस आहे. भाजे हे प्राटीन बौद्ध लेण्यांसाठी प्रसिध्द असलेले गाव याच्या पायथ्याला आहे. मुळवली स्टेशवरून उतरल्यानंतर भाजे गावातून विसापूरला जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
पहिल्या वाट जंगलातू जाते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायऱ्या लागतात. या पायऱ्या सोडून एक पायवाट जंगलात जाते. उजवीकेडे पाटवाट सुरु झाल्यानंतर २० मिनिटांना काही घरे लागतात. तिथे मोडकळीस आलेल्या पायऱ्या आणि बाजुलाच एक मंदिर आहे.
दुसऱ्या वाटेने भाजे गावात गायमुख खिंडपर्यंत यावे. गायमुख डावीकडे जंगलात जाणारी वाट ,थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.
तोरणा
तोराणा किल्ला हा पुण्यात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. तोरणा किल्ल्याला प्रंचडगड नावानेही ओळखले जाते. तोरणा किल्ल्याचा परिसर आजूबाजूची शहरे आणि खेड्यांसह रस्त्याद्वारे जोडला गेला आहे आणि म्हणूनच आपण रस्त्याद्वारे थेट तोरणा किल्ल्यावर पोहोचू शकता. तोरणागड चढाईसाठी तसा सोपा आहे पण काही ठिकाणी चढाई कठिण आहे. तुंग
मावाळातील तुंग किल्ला किंवा कठिण गड हा गिरिदुर्ग प्रकारातील आहे.
तुंग किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, तिकोना, मोरागड, कोरीगड, पवना धरण, ॲम्बी व्हॅली यांचा भन्नाट नजारा दिसतो. तुंग किल्यावर जाण्यासाठी तुम्ही लोणावळा स्टेशनला यावे लागेल तेथून तुम्हाला किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी स्थानिक वाहनाने जाऊ शकता
वासोटा
सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वसलेला वासोटा हा वनदुर्ग. हा किल्ला व्याघ्रगड नावानेही ओळखला जातो. साहसी ट्रेकची आवड असणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी हा आदर्श किल्ला आहे. अभयारण्यात वसलेला हा वनदुर्ग म्हणजे थंडी व उन्हाळ्यातील ट्रेकचा भन्नाट पर्याय. साताऱ्याहून कास पठारमार्गे बामणोली गावात जायचे. बामणोली गावातून वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसागर तलाव बोटीने पार करावा लागतो. तिथून वनखात्याच्या चेकपोस्टपासून खड्या चढाईने दोन तासांत वासोट्याच्या माथ्यावर आपण पोचतो. हा संपूर्ण प्रवास घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने नितांत सुंदर आणि आनंददायी आहे.या किल्ल्यावर जाण्यापूर्वी तुम्ही कास पठाराचाही आनंद घेऊ शकता.
कात्रज ते सिंहगड
कात्रज ते सिंहगड हा नाईट ट्रेक खूप प्रसिद्ध आहे. पुणे सातारा रस्त्याने कात्रजच्या जुन्या बोगदा जिथे संपतो तेथेून सुरुवात होते. डोंगर - दऱ्यांची, झाड-झुडपातील वाट. एकूण तेरा टेकड्या पार चढाव्या आणि उतराव्या लागतात त्यांनतर तुम्ही सिंहगडाच्या पक्क्या वाटेला पोहचता. तेथून गडावर जाण्यासाठी दोन पर्याय आहेत एक डोंगरातून आणि दुसरा गाडीने. रात्रभर पायपीठ करत कात्रज ते सिंहगड पूर्ण करण्याचा अनुभव कायम
लक्षात राहिल.
राजगड ट्रेक
राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पूर्वी याला मुरूमदेव असेही म्हटले जाते. हा किल्ला पुणे स्टेशनपासून सुमारे ६५ किलोमीटर तर मुंबईपासून २०० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच नसरापूर, गुंजावणे, पाली, किंवा भोर मार्गे तुम्ही ड्राईव्ह करून येऊ शकता.
हरिशचंद्र गड
हरिश्चंद्रगड किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. पुणे नगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात हरिश्चंद्र गड आहे. माळशेज घाटाच्या डावीकडे व पिंपळगाव जोग धरणाच्या सानिध्यात हा किल्ला आहे. या किल्ल्याला भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. हरिशचंद्र गडावरील कोकण कडा हे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. येथून सुर्योदय आणि सुर्यास्त अतिशय सुंदर दिसतो. घनदाट जंगलातून पायवाट वाटेने जाणारा प्रवास रोमांचित करणार आहे.
पुणे मुंबई सारख्या शहरांपासून हरिशचंद् गडाच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन इगतपुरी आहे. तेथून पुढील अंतर तुम्हाला वाहनाने प्रवास करावा लागेल.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.