Best Four Places to visit Sakal
Tourism: हिवाळा (Winter) आता संपत आला असला तरी थंडीचा जोर मात्र ओसरल्याचं दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला जर प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल, तर हवामान सामान्य असेल अशा ठिकाणी फिरायला जाण्याची योजना करा. आज आपण अशाच काही ठिकाणांची माहिती घेणार आहोत. जेथील आल्हाददायक हवामान तुमच्या सहलीची मजा द्विगुणीत करेल. (Best places to visit these days)
1.कच्छचे रण - रन ऑफ कच्छ हे गुजरातमधील कच्छ शहरात उत्तर आणि पूर्वेला पसरलेले जगातील सर्वात मोठे मीठाचे वाळवंट आहे, जे 'रन ऑफ कच्छ' म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी होणारा कच्छ महोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. तो पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येत असतात. या उत्सवाचा आनंद घेण्यासोबतच तुम्ही डेझर्ट सफारीपासून ते लोकगीते आणि लोकनृत्यांचाही आनंद घेऊ शकता.2. गोवा (Goa)- गोव्याला भेट देण्याचा सीझन नोव्हेंबरपासून सुरू होत असला, तरी जानेवारीतही इथे येण्याचा प्लॅन करू शकता. येथे अनेक साहसी प्रकार येथे उपलब्ध आहेत आणि ज्यांना पार्टी करायला आवडतं त्यांच्यासाठीदेखील हे ठिकाण उत्तम आहे.3. जैसलमेर (Jaisalmer)-थारच्या वाळवंटात वसलेले जैसलमेर विशेषतः पिवळ्या दगडाच्या इमारती आणि वाळूवर चालणाऱ्या उंटांच्या रांगांसाठी ओळखले जाते. जैसलमेर किल्ला, नथमल की हवेली, सलीम सिंग की हवेली, पटवन की हवेली, मंदिर पॅलेस, गडीसर तलाव अशी अनेक ठिकाणे आहेत जी तुमची सहल संस्मरणीय बनवतील. येथे जावून फोटोग्राफीची संधी अजिबात सोडू नका.4. बिकानेर (Bikaner)- जानेवारीमध्ये भेट देण्यासाठी बिकानेर देखील उत्तम आहे. कारण त्या काळात येथे उंट महोत्सव आयोजित केला जातो. तो इतका प्रेक्षणीय आणि भव्य असतो की तो पाहण्यासाठी परदेशातूनही पर्यटक येतात. कुटुंबासह आनंद घेण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असू शकत नाही.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.