Agneepath Scheme Violence esakal
मोदी सरकारच्या (Modi Government) अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) देशभरात अजूनही विरोध सुरूच आहे.
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या (Modi Government) अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) देशभरात अजूनही विरोध सुरूच आहे. उत्तर भारतातून (North India) सुरू झालेलं हे आंदोलन आता देशभर पसरलीय.अनेक ठिकाणी आंदोलकांनी रेल्वे स्थानकांना लक्ष्य केलंय, त्यामुळं रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वेनं मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द केल्या. मात्र, अद्याप एकही गाडी सुरु करण्यात आलेली नाहीय.रेल्वे मंत्रालयाच्या (Railway Ministry) म्हणण्यानुसार, अग्निपथ योजनेला होत असलेला विरोध पाहता 181 मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय, 348 पॅसेंजर गाड्याही (Passenger Trains) रद्द केल्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत रद्द झालेल्या गाड्यांची एकूण संख्या 529 आहे. तर, चार मेल एक्सप्रेस आणि 6 पॅसेंजर गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या.दुसरीकडं तामिळनाडूतही या योजनेला विरोध सुरू झालाय. या पार्श्वभूमीवर चेन्नई रेल्वे विभागानं (Chennai Railway Department) मोठा निर्णय घेतलाय.रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चेन्नई विभागातील कोणत्याही स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट दिलं जाणार नाहीयत. तात्पुरता असलेला भारत बंद (Bharat Bandh) पाहता हा निर्णय घेण्यात आलाय. परिस्थिती सामान्य होताच प्लॅटफॉर्म तिकिटं पुन्हा सुरू केली जाणार आहेत.दरम्यान, भारत बंदच्या घोषणेनंतर ठिकठिकाणी निदर्शनं होत आहेत. याचा सर्वात मोठा परिणाम दिल्ली-एनसीआरमध्ये दिसून आला, जिथं नोएडा आणि गुरुग्राममध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम आहे, त्यामुळं वाहनचालकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. मात्र, आता हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.