Big Boss fame Sonali Phogat death,know about her lovestory and family Instagram
Sonali Phogat: बिग बॉस १४ ची स्पर्धक राहिलेल्या भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे निधन झाले आहे. गोव्यात हृद्यविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. सोशल मीडियावर आपल्या रील आणि व्हिडीओमुळे सोनाली नेहमीच चर्चेत असायच्या. त्यांच्या निधनाच्या बातमीनं साऱ्यांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी आहे,जिचा त्या एकटीनं सांभाळ करायच्या. चला जाणून घेऊया सोनाली फोगाट यांच्या लव्हलाईफविषयी आणि कुटुंबाविषयी सविस्तर.
सोनाली फोगाट बिग बॉसमध्ये असताना राहूल वैद्यला म्हणाल्या होत्या,''माझ्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू अगदी अनपेक्षितरित्या झाला आहे. मी कधीच विचार केला नव्हता माझे पती मला सोडून जातील. जेव्हा त्यांचे निधन झाले,तेव्हा मी मुंबईत होते. त्यांच्या मृत्यूनंतर मी कायम अस्वस्थ असायचे. त्यांच्या मृत्यूनंतर मला राजकारण,अभिनय सगळंच सोडून द्यावं असं वाटत होतं. पण तेव्हा माझ्या सासूनं मला हिम्मत दिली पुढे जाण्याची.''सोनाली फोगाट हरियाणातील Bhuthan गावातून होत्या. सोनाली यांच्या मोठ्या बहिणीचं लग्नदेखील फोगाट कुटुंबातच झालं होतं. सोनाली यांना नेहमीच अभिनेत्रीच व्हायचं होतं. सोनाली यांनी छोट्या पडद्यावरनं आपल्या करिअरची सुरुवात अॅंकर म्हणून केली.बिग बॉसमध्ये असताना सोनालीला टी.व्हीवरचा हॅन्डसम हन्क अली गोणी आवडायला लागला होता. त्यांनी तेव्हा नॅशनल टेलिव्हिजनवर अली गोनीप्रती आपल्या भावना बोलून दाखवल्या होत्या. त्या दोघांनाही मग खूप त्यावरनं चिडवलं देखील गेलं. पण इथे लव्हस्टोरीचा संदर्भ जोडणं योग्य ठरणार नाही. कारण अली गोनी जॅस्मिन भसीनच्या तेव्हा ऑलरेडी प्रेमात होता. आणि हे सोनालीला माहीत होते. अली सोबत नाव जोडलं जाणं ही फक्त सोनालीची बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठीची स्ट्रॅटेजी होती. मात्र बिग बॉस संपल्यानंतरही अली आणि सोनाली दोघेही चांगले मित्र बनून राहिले.सोनाली यांना पहिला ब्रेक मिळाला तो झीटीव्ही वरील 'अम्मा' मालिकेच्या माध्यमातून. ती मालिका भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित होती. सोनाली सोशल मीडियावर खूपच पॉप्युलर होत्या. त्या टीकटॉक स्टार होत्या. सोनाली २०१९ मध्ये हरियाातून भाजपातर्फे निवडणूकीसाठी उभ्या राहिल्या होत्या. पण तिथे त्यांचा पराभव झाला होता. बीजेपीच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या त्या सदस्या होत्या. त्यांनी झारखंड,मध्यप्रदेश मधील आदिवासी क्षेत्रासाठी देखील काम केलं आहे. २०२० मध्ये सोनाली यांनी एका अधिकाऱ्याला चप्पलने मारल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.