Valentine's Bird Love esakal
वसंतऋतू येताना निसर्ग बदलतो अन् पानगळ सुरू होते. या ऋतूमुळे सृष्टीला बहर येत आहे. त्यासाठी वृक्षदेखील नटून-थटून स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.अनेक वृक्षांवर फुले, फळे आल्याने पक्ष्यांसाठी (Valentine's Bird Love) ते ज्यूसबार ठरत आहेत. त्यातच जर घराच्या आजूबाजूला खूप झाडी आणि सोबत चांगल्या कॅमेऱ्याची साथ असेल तर बहरणाऱ्या निसर्गाला कैद करता येऊ शकते.या निसर्गातील पक्षीवैभव येथील पर्यावरणप्रेमी व पक्षीप्रेमी फिरोज चाऊस यांनी आठवडाभरात टिपले आहे.'हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे... असेच गीत व्हॅलेंटाईन दिनी (Valentine's Day) पक्ष्यांना पाहून मनी येत आहे.वसंतऋतू येताना भवतालचे वातावरण बदलते. वृक्षांसाठी हा काळ म्हणजे पाने टाकून देण्याचा, पर्णवैराग्य स्वीकारून पुन्हा फुलण्याचा आहे.या वसंतात पळस, पांगारा, सावरी, अंजन, शिरीष, गणेश अशी अनेक झाडे फुलतात आणि त्यावर पक्ष्यांचे जणूकाही संमेलनच भरलेले पहायला मिळते.पक्ष्यांच्या नजरेला या वृक्षांवरील भडक रंगाची फुले आकर्षून घेतात. त्यातील मकरंद चाखायला पक्षी गर्दी करतात.आपल्याकडे वसंत ऋतू हा फेब्रुवारीच्या मध्यापासून ते एप्रिलच्या मध्यापर्यंत असतो. तसा असायला हवा, असेही ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञांनी सांगितलेले आहे.काल १४ फेब्रुवारी असल्याने प्रेमाचा दिन समजला गेला. प्रेम म्हणजे केवळ माणसांचे नसते, तर ते निसर्गातही दिसून येते. पक्ष्यांमधील लाडीगोडी निरीक्षणातून आपल्या समजून येते. हीच लाडीगोडी निपाणी येथे फिरोज चाऊस यांनी आठवड्यापासून अनुभवली आहे.त्यांनी तांबट, चष्मेवाला, बुलबुल, पोपटासह अनेक पक्ष्यांच्या जोडप्यांचे निरीक्षण केले असून, त्यांची छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद केली आहेत. त्यांचा हा अनोखा छंद बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. (टीप : काही फोटो Google वरुन घेण्यात आले आहेत.)सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.