मुंबई - आपल्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणून दीपक डोब्रियालचे नाव घेता येईल. तो एक विनोदी अभिनेता आहे. मात्र त्यानं आपण विनोदी भूमिकांमध्ये अडकून पडायचं नाही हे लक्षात ठेवून काही गंभीर भूमिकाही केल्या. आपल्या अभिनयाला थिएटरच्या पार्श्वभूमीची जोड देऊन प्रेक्षकांची पसंती मिळवलेला अभिनेता म्हणून दीपकला ओळखले जाते. त्यानं एका मुलाखतीच्या आधारे काही आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात आतापर्यतच्या संघर्षगाथेला शब्दबद्ध केले आहे. रोमँटिक कॉमेडी अभिनेता अशा अर्थानं आतापर्यत दीपकला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे.
तुम्ही जर कंगनाचा तन्नु वेड्स मन्नु पाहिला असेल तर त्यातला पप्पी लक्षात राहिला असेल. ती भूमिका दीपक डोब्रियालनं केली होती. मी एक गंभीर अभिनेता आहे ही प्रतिमा तनु वेडस मन्नुनं बदलून टाकली होती. त्या चित्रपटानं मला खूप काही शिकवलं. मी त्यातून घड़लो. दीपकनं आफत ए इश्कमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ती सध्याची त्याची नवी भूमिका आहे. त्यामध्ये नेहा शर्माही दिसणार आहे. हिंदी मीडियममधील श्याम प्रकाशची भूमिका त्याच्या आठवणीतील भूमिका आहे. आपण एक थिटएरमधील कलाकार आहोत आणि गेल्या काही चित्रपटांपासून ती आठवण विसरल्यासारखे झालो आहोत. असं या चित्रपटाच्या निमित्तानं त्यानं सांगितले आहे.
मी थिएटर करायचं सोडलं याचा मला जराही पश्चाताप नाही. ना त्याची खंत आहे. मात्र आपण ज्या क्षेत्रात सात वर्षे काम केलं ते विसण्यासाठी दोन वर्षे खर्च करावी लागली याची रुखरुख त्याला आहे.
बॉलीवू़डमध्ये दरवर्षी शंभरहून अधिक चित्रपट प्रदर्शित होतात. अशावेळी फार कमी चित्रपट असे असतात की ते प्रेक्षकांना भावतात. आपल्याला अशा चित्रपटांचा भाग व्हायचे आहे असे दीपक सांगतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.