bollywood actor nawazuddin siddiqui success story watchman to bunglow owner sakal
Nawazuddin Siddiqui birthday : अत्यंत प्रतिकूल प्रतिस्थितीतुन संघर्ष करत आज यशाचं शिखर गाठणाऱ्या अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui)चा आज वाढदिवस. नवाझने आपल्या अभिनयाने अक्षरशः चाहत्यांना भुरळ घातली आहे. आज जरी त्याने हे यश मिळवलं असलं तरी एकेकाळी त्याने वाॅचमनचं काम केलं आहे. यावर विश्वास बसणार नाही, पण खरे आहे. ज्यावेळी चित्रपट विश्वात नवाझला कामं मिळत नव्हती तेव्हा नवाझने चरितार्थ चालण्यासाठी वाॅचमनचे काम केले होते. पुढे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने मुंबईत स्वतःचा बंगला घेतला आहे. पाहूया काय आहे नवाजची सक्सेस स्टोरी...
बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा जन्म १९ मे १९७४ रोजी उत्तर प्रदेशच्या बुढानामध्ये झाला. या अभिनेत्यानं नायकाच्या चेहऱ्याची व्याख्याच बदलून टाकली. आपल्या अभिनयाच्या जोरावर नावझनं बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. इथंपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने मोठा संघर्ष केला आहे. १९९५ पासून नवाझ या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करत होता. १९९९ च्या दरम्यान त्याला चित्रपटांमध्ये काही संधी मिळू लागल्या. २०१२ पर्यंत त्याचा हा संघर्ष सुरु होता. अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर' ने नवाझच्या अभिनयाची ओळख जगाला करून दिली. नवाझनं या चित्रपटात फैजल ही व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेने त्याचे आयुष्य पालटले. पण त्याच्या संघर्षाच्या काळात दैनंदिन उपजीविका करणेही त्याला मुश्किल झाले होते. त्यामुळे पोट भरण्यासाठी नवाझने चक्क वाॅचमेनची नोकरी स्वीकारली. यावेळी मेडिकलमध्ये काम आणि वॉचमनची नोकरी तो करत होता. याबाबत त्याने स्वतः एका मुलाखतीत माहिती दिली आहे. म्हणूनच कदाचित एवढं यश मिळवूनही नवाझ सामान्य कलाकाराप्रमाणेच वागतो. त्याच्यातील साधेपणा याच संघर्षातुन आला असावा. आजही चित्रीकरण झाल्यानंतर नवाझ आपल्या गावी निघून जातो. तिथल्या माणसांमध्ये, शेतीमध्ये तो रमतो. या मेहनतीचे फळ म्हणजे नवाझचे मुंबईतील घर. काही दिवासांपूर्वीच नवाझने मुंबईमध्ये स्वतःचा बंगला खरेदी केला. अंदाजे २०० कोटींहून अधिक किमतीचा हा बंगला असल्याचे बोलले जाते. अत्यंत आलिशान अशा या घराला त्याने उत्तर प्रदेशातील घराप्रमाणे राजेशाही लुक दिला आहे. शिवाय घराबाहेर गार्डन, अद्ययावत सुविधा याने हे घर सजलेले आहे. 'नवाब' असे या बंगल्याचे नाव आहे. ज्या माणसाने कधीकाळी वाॅचमनचे काम केले होते. तो आज अत्यंत मेहनतीने आणि चिकाटीने मुंबई सारख्या ठिकाणी एका बंगल्याचा मालक झाला आहे. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.