Patralekhaa marries Rajkummar Rao Instagram
बॉलिवूडमधील लव्ह बर्ड्स अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री पत्रलेखा (Patralekhaa) हे अखेर लग्नबंधनात अडकले. ते एकमेकांना ११ वर्षे डेट करत होते. कुटुंबीय आणि जिवलग मित्रपरिवाराच्या साक्षीने चंदीगडमध्ये लग्न केलं.
राजकुमारने चंदीगडमधील आलिशान हॉटेल ओबेरॉय सुखविलास येथे लग्न केलं.बॉलिवूड कोरियोग्राफर फराह खानने लग्नाला हजेरी लावली होती.लग्नसोहळ्यात राजकुमारने सिल्क कुर्ता, चुडीदार, गुलाबी दुपट्टा आणि त्यावर लाल रंगाची पगडी असा लूक केला होता. तर पत्रलेखाने लाल रंगाची साडी परिधान केली होती. प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने या दोघांचे कपडे डिझाइन केले होते.लग्नसोहळ्यातील पत्रलेखाचा शाही लूकजवळपास ११ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नापूर्वीचा पत्रलेखाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रलेखाचा ब्रायडल मेकअपया दोघांचा शुक्रवारी (ता. १२) साखरपूडा झाला. साखरपुड्यासाठी दोघांनी पांढऱ्या रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.