Actors Injured On Film Sets Instagram
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्यासोबत देखील मोठा जीवघेणा प्रसंग घडला होता. 'कुली' सिनेमाच्या सेटवर शूटिंग दरम्यान अभिनेते पुनीत इस्सरनं चेहऱ्यावर मारलेला ठोसा अमिताभ बच्चन यांना भारी पडला होता. ते थेट त्यामुळे टेबलवर जाऊन आदळले होते. आणि टेबलमुळे बिग बींच्या पोटाला खूप लागलं होतं. त्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं आणि खूप औषधोपचार,प्रार्थनेनंतर अमिताभ त्यातून वाचले होते. बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या (Aishwarya Rai)२००४ साली 'खाकी' सिनेमाच्या सेटवर जखमी झाली होती. एक अॅक्शन सीक्वेन्स शूट करताना तिला एका जीपवर चढायचं होतं पण अचानक तिचा बॅलन्स चुकला अन् ती चालत्या जीपमधून खाली पडली. त्यानंतर तिथे उपस्थित सर्व लोकांनी जखमी झालेल्या ऐश्वर्याला इस्पितळात त्वरित हलवलं होतं.हृतिकही(Hrithik Roshan) 'क्रिश' सिनेमाच्या सेटवर मोठ्या अपघातातून वाचला आहे. त्याला एक स्टंट करायचा होता, त्याला एका केबल वायरनं बांधण्यात आलं होतं. पण ती वायर नंतर तूटली अन् ह्तिक तब्बल ५० फूटावरुन खाली फेकला गेला. त्याला नंतर इस्पितळात तातडीनं दाखल केलं गेलं. उपचारानंतरही त्याला बरं व्हायला खूप दिवस लागले. 'तेरे नाम'सिनेमाच्या सेटवर सलमान(Salman Khan) मोठ्या प्रमाणात जखमी होता-होता वाचला होता. सलमानला एका सीन दरम्यान रेल्वे ट्रॅकवर चालायचं होतं. पण तो आपल्या सीन मध्ये इतका गुंग होता की त्याला पाठून ट्रेन येतेय हे देखील ध्यानात आलं नाही. जेव्हा सलमान सोबत काम करणाऱ्या एका सहकलाकारानं ट्रेन येताना पाहिलं तेव्हा सलमानला धक्का देऊन बाजूला केलं आणि त्याचे प्राण वाचवले. लारा दत्ता(Lara Dutta) तिच्या पदार्पणातील 'अंदाज' सिनेमाच्या शूटसाठी केपटाऊनला गेली होती. तेव्हा एका सीनमध्ये तिला खोल पाण्यात उतरायचं होतं. पण लारा त्यासाठी घाबरत होती. कारण तिला प्रत्यक्ष आयुष्यातही पाण्याची खूप भीती वाटते. अचानक शूटिंग सुरू असताना ती पाण्यात पडली अन् तिला स्वतःला सावरता येईना. तेव्हा अक्षयनं पाण्यात उडी मारुन तिला वाचवलं होतं. सध्या आयेशा टाकिया बॉलीवूडपासून लांब राहत आपलं फॅमिली लाईफ एन्जॉय करत आहे. पण एकदा शूटिंगच्या दरम्यान ती देखील एका जीवघेण्या प्रसंगाची शिकार ठरली होती. 'डोर' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एक सीन शूट करताना तिला चालत्या ट्रेनमध्ये चढायचं होतं. पण तिचा पाय घसरला अन् ती दुसऱ्या ट्रॅक वर जाऊन पडली. आणि त्याच ट्रॅकवर नेमकी ट्रेन पास होत होती. पण तिथे उपस्थितांनी प्रसंगावधान राखून तिला वाचवलं.बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानसोबत २००० साली 'क्या कहना' या त्याच्या सिनेमाच्या सेटवर मोठा अपघात झाला होता. सैफ मोटारबाईक चालवत असताना,गाडी अचानक घसरली आणि सैफ एका दगडावर जाऊन आपटला. त्यानंतर सैफ बेशुद्ध पडला होता अन् त्याला त्वरीत इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं.सनी लियोनच्या 'वन नाइट स्टॅंड' या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सनीचे प्राण जाता-जाता वाचले होते. या सिनेमातील एक सीन समु्द्राच्या किनाऱ्याला शूट होत होता. तेव्हा सनीलाच कळलं नाही की ती कशी समुद्राच्या लाटांच्या तावडीत फसली,त्या लाटा तिला आत ओढू लागल्या अन् ती समु्द्रात ओढली गेली. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या रेस्क्यू टीमनं तिचे प्राण वाचवले म्हणून सनी वाचली म्हणायची. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.