Young Actresses Net Worth esakal
Young Bollywood Actresses Net Worth: बॉलीवूडमध्ये नव्या तारकांचे मोठ्या प्रमाणावर आगमन झाले आहे. त्यातील बऱ्याचशा अभिनेत्री या ज्येष्ठ कलाकारांच्या मुली आहेत. त्यात सोनम कपूर, करिना कपूर, आलिया भट्ट, अनन्या पांडे, सारा अली खान, जान्हवी कपूर, यांच्या नावाचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. या अभिनेत्रींनी आपल्यापेक्षा सिनिअर आणि हायपेड अभिनेत्रींना टक्कर दिली आहे. त्यामध्ये दीपिका आणि कतरिना कैफचे नाव घ्यावे लागेल. यासगळ्यात सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या अभिनेत्री कोण हे जाणून घेणार आहोत. कमी वयात लाईमलाईटमध्ये आलेल्या अभिनेत्रींमध्ये कुणाचे नाव आहे, कोणती अभिनेत्री सर्वाधिक लोकप्रिय आहे, याची माहिती घेणार आहोत.
सारा अली खान - सैफ अली खान प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची नात असणाऱ्या साराचा चाहतावर्ग मोठा आहे. केदारनाथ पासून तिनं आपल्या बॉलीवूडच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. तरुणाईमध्ये सर्वाधिक आकर्षक अभिनेत्री म्हणून साराच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. तिची एकुण संपत्ती ही 4 मिलियन एवढी आहे. जान्हवी कपूर - सारा अली खानच्या अगोदर जान्हवी बॉलीवूडमध्ये आली होती. मात्र तिला अद्याप म्हणावे असे यश मिळालेले नाही. करण जोहरच्या एका चित्रपटातून तिला ब्रेक मिळाला. सोशल मीडियावर जान्हवी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या संपत्तीविषयी बोलायचे झाल्यास जान्हवी ही 8 मिलियन डॉलरची मालकीण आहे.
क्रिती सेनन - हिरोपंती पासून करिअरला सुरुवात करणाऱ्या क्रितीनं बॉलीवूडमध्ये चांगलाच जम बसवला आहे. क्रितीनं काही काळ संघर्षही केला आहे. मात्र अश्विनी तिवारीच्या बरेली की बर्फीमधून तिच्या वाट्याला मोठी लोकप्रियता आली. क्रितीची संपत्ती ही 5 मिलियन एवढी आहे.
आलिया भट्ट - आलियानं बॉलीवूडमध्ये नऊ वर्षे पुर्ण केली आहेत. करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयरपासून सुरुवात करणाऱ्या आलियानं आपल्या अभिनयानं चाहत्यांना जिंकून घेतले आहे. सध्याच्या घडीला नवोदित अभिनेत्रींमध्ये आलिया ही सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. जीक्यु इंडियाच्या रिपोर्टनुसार आलियाची संपत्ती 21 मिलियन डॉलर एवढी आहे.
कियारा अडवाणी - कबीर सिंगनंतर कियाराची गाडी जोरात सुरु झाली. त्यानंतर शेरशाहमधून ती प्रचंड लोकप्रिय झाली. सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून कियाराचे नाव घेतले जाते. तिच्या प्रॉपर्टीची गोष्ट करायची झाल्यास ती 3.8 मिलियन एवढी आहे.
अनन्या पांडे - अनन्या तर तुफान चर्चेत आहे. ती टॉलीवूड सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या लायगरमध्ये दिसणार आहे. अनन्यानं स्टुडंड ऑफ द इयर 2 पासून कमबॅक केले होते. त्यानंतर तिच्याकडे मोठमोठे चित्रपट येण्यास सुरुवात झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्याकडे 4 मिलियन डॉलरची संपत्ती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.