बॉलीवूडमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात खळबळ सुरु आहे. याचे कारण म्हणजे किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यनला अटक झाली आहे. आणि त्याल अद्याप जामीन मिळालेला नाही. सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर आर्यनच्या वकीलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणाच्या निमित्तानं आतापर्यत एनसीबीनं बॉलीवूडमधील कोणकोणत्या सेलिब्रेटींवर कारवाई केली आहे. याची माहिती आपण घेणार आहोत.
इगतपूरीतील मोठी कारवाई -
याशिवाय इगतपूरी मध्ये झालेल्या एका रेव्ह पार्टीमध्ये 22 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यात 12 महिलांचा समावेश होता. हे सर्वजण अंमली पदार्थांचे सेवन करणारे होते. असे तपासातून समोर आले होते. ही पार्टी दोन खासगी बंगल्यामध्ये आयोजित करण्यात आली होती.
अर्जुन रामपालच्या मैत्रीणीचा भाऊ -
साधारण दोन आठवड्यांपूर्वी एनसीबीनं गोव्यामध्ये एक सिक्रेट ऑपरेशन केलं. त्यात त्यांनी प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपालच्या मैत्रीणीचा भाऊ अगिस्लाओस डेमरेटिसला अटक करण्यात आली होती. त्यावेळी अर्जुनचीही चौकशी झाली होती.
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया - या दोन्ही सेलिब्रेटींच्या घरातून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यांचे घर आणि कार्यालयातून 86.5 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. एनसीबीला खबर मिळाली होती की, भारतीच्या घरी ड्रग्जचा साठा आहे.
अरमान कोहली - armaan kohli
गेल्या महिन्यामध्ये अरमान कोहलीचा जामीन फेटाळला गेला. त्याच्या घरुन एनसीबीनं अंमलीपदार्थ जप्त केले होते. त्यावर त्यानं आपल्याकडे अतिशय कमी मात्रेमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगितले होते. त्याला अटक केल्यानंतर त्यानं जामीनासाठी न्यायालयात दोन वेळा जामीनासाठी अर्ज केला होता.
रेहा चक्रवर्ती - Rhea Chakraborty
रेहाला एनसीबीनं अटक केल्यानंतर तिनं तातडीनं जामीनासाठी अर्ज केला होता. तिलाही जामीन मिळण्यात मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं. एनसीबीनं तिला नियमितपणे ड्रग्ज घेणारी व्यक्ती असं म्हटलं होतं. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर तिला अटक करण्यात आली होती.
सुशांत सिंग राजपूत - sushant singh rajput
सीबीआयनं आपल्या तपासातून अभिनेता सुशांत सिंग देखील ड्रग्ज घेत होता असं सांगितलं होतं. त्यानं आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणाचा तपास करताना अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींची नावं समोर आली होती. त्यातून मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.