bollywood movies file image
बॉलिवूडमधील सत्य घटनेवर आधारित असलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. पाहूयात असेच काही चित्रपट ज्याचे कथानक सत्य घटनेवर आधारित आहे.
2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या निरजा या चित्रपटाचे कथानक हे नीरजा भानोत यांच्या जिवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनम कपूरने प्रमुख भूमिका साकारली आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला मंटो हा चित्रपट फाळणीच्या वेळी संकटांना सामोरे जाणाऱ्या सआदत हसन मंटो या लेखकाच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे
दिग्दर्शन नंदिता दास यांनी केले असून चित्रपटात प्रमुख भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली आहे. नेजी आणि डिव्हाइन या दोन रॅपर्सच्या आयुष्यावर गल्ली बॉय या चित्रपटाचे कथानक लिहीले आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने प्रमुख भूमिका साकारली असून जोया अख्तरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. गल्ली बॉय चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 230 कोटींची कमाई केली. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा पॅडमॅन या चित्रपटाचे कथानक अरुणाचलम मुरुगन्थम यांच्या जिवनावर आधारित आहे. अरूणाचलम यांनी गावातील महिलांना सॅनिटरी पॅडचे महत्त्व सांगून त्याबद्दल संशोधन केले.शेरशाह हा चित्रपट कारगिल युद्धामध्ये शहिद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा (vikram batra) यांच्या शौर्य गाथेवर आधारित आहे. 12 ऑगस्टला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. सिद्धार्थ मल्होत्राने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.