Bollywood movies imdb esakal
Bollywood Movies: टॉलीवूडच्या काही चित्रपटांनी बॉलीवूडला धोबीपछाड करुन टाकले आहे. एकापेक्षा एक सरस अशा चित्रपटांनी बॉलीवूडवर आपला प्रभाव उमटविण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये अल्लु अर्जुनच्या पुष्पापासून कमल (Pushpa Movie) हासनच्या विक्रमपर्यत अशा सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. सध्या आयएमडीबीनं जाहिर केलेल्या यादीची चर्चा आहे. त्या यादीतून काश्मीर फाईल्स नावाचा चित्रपट बाहेर पडला आहे. तर केजीएफ 2 (Kashmir Files) नावाचा चित्रपट सहाव्या स्थानी गेला आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, पहिल्या स्थानी कोणता चित्रपट आहे?एक लव या - Ek Love Ya ही एक म्युझिकल रोमँटिक फिल्म आहे. त्याला केजीएफ इतकीच रेटिंग मिळाली आहे. फिल्ममध्ये अमर नावाचा मुलगा आहे. त्याचं अनीतावर प्रेम जडतं. मात्र अनिता त्याच्या प्रेमाचा स्विकार काही करत नाही. त्यानंतर त्या दोघांच्या आयुष्यात येणारं वादळ. हा या चित्रपटाचा विषय आहे.
मेजर - मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित मेजर चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याला 8.4 अस रेटिंग मिळालं आहे. 2008 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मेजर संदीप यांना वीरमरण आले होते. त्यावर आधारित हा चित्रपट आहे. ओल्ड माँक - एमजी श्रीनिवास यांचं दिग्दर्शन केलेली ही फिल्म समीक्षक, जाणकार प्रेक्षक, अभ्यासक यांना कमालीची भावली आहे. त्याला आयएमडीबीनं 8.5 रेटिंग दिलं आहे. ही फिल्म अॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. एक लव या - Ek Love Ya ही एक म्युझिकल रोमँटिक फिल्म आहे. त्याला केजीएफ इतकीच रेटिंग मिळाली आहे. फिल्ममध्ये अमर नावाचा मुलगा आहे. त्याचं अनीतावर प्रेम जडतं. मात्र अनिता त्याच्या प्रेमाचा स्विकार काही करत नाही. त्यानंतर त्या दोघांच्या आयुष्यात येणारं वादळ. हा या चित्रपटाचा विषय आहे. कडैसी विवासई - आयएमडीबीनं या चित्रपटाला 8.8 असं रेटिंग देण्यात आलं आहे. कडैसी विवासईचा अर्थ शेवटचा शेतकरी असा आहे. मणिकंदन या चित्रपटाची कथा अशा गावातील आहे ज्यात एकटाच शेतकरी आहे. तो अजुनही शेती करतो आहे. एका बड्या बिल्डरशी त्यानं पंगा घेतला आहे. विक्रम - विक्रम हा एक अॅक्शन - थ्रिलर मुव्ही आहे. ज्यात कमल हासन, फासिल फवाद आणि विजय सेतूपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याला आयएमडीबीनं 8.6 असं रेटिंग मिळालं आहे. तो आता ओटीटीवर देखील आला आहे. रॉकेट्री: द नंबी इफेक्ट - आर माधवन लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट पहिल्या स्थानावर आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. इस्त्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित हा बायोपिक आहे. त्याला 9.3 असं रेटिंगही मिळालं आहे. खुदा हाफिज 2, अग्निपरीक्षा - विद्युत जामवाल आणि शिवालिका ऑबेरॉय यांच्या खुदा हाफिजला प्रेक्षक पसंत करत आहे. मात्र त्याला अद्याप बॉक्स ऑफिसवर फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. सहा दिवसांत या चित्रपटानं केवळ साडेनऊ कोटींची कमाई केली आहे. 777 चार्ली - सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत चार्ली हा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याला 9.1 असं रेटिंग देण्यात आलं आहे. एका वेगळ्या विषयावरील या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. एका फिरस्त्या माणसाच्या या कथेत कुत्र्याची भूमिका, त्याची मैत्री हे सारं आवर्जुन पाहण्यासारखं आहे. केजीएफ 2 - प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केलेल्या केजीएफच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर केजीएफचा 2 भाग प्रेक्षकांसमोर आला. त्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या चित्रपटानं शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.