ऑस्कर विजेत्या प्रसिद्ध संगीतकार (Oscar Winner) ए आर रहमानचा (A R Rehman) आज जन्मदिन. टॉलीवूडच्या रोजापासून त्यानं आपल्या करिअरची सुरुवात केली. रोजा हा मणिरत्नम (Roja) यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट होता. त्याला रहमाननं पहिल्यांदा संगीत दिलं. त्यातील दिल है छोटासा हे गाणं कमालीचं लोकप्रिय झालं होतं. रोजामधील सगळीच गाणी हिट झाली होती. त्यानंतर रहमाननं कधी मागे वळून पाहिलं नाही. त्याचा जोरदार प्रवास सुरु झाला. डॅनी बॉयल दिग्दर्शित स्लम डॉग मिलिनियरला (Slumdog Millioner) ऑस्कर मिळाला. त्या चित्रपटाला रहमाननं संगीत दिलं होतं. आज त्याच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देणार आहोत.अमर उजालानं घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये रहमाननं वंदे मातरमच्या मेकिंगची गोष्ट सांगितली आहे. त्यावेळी त्या गाण्याचा प्रवास आपल्या दृष्टीनं किती खडतर होता हे सांगितलं आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं रहमानचं मा तुझे सलाम, वंदे मातरम हे गाणं ऐकतोच. त्या गाण्याशिवाय स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट झाला असे आपल्याला वाटतच नाही. मात्र ते गाणं जेव्हा बनवण्याचे काम सुरु होते त्यावेळच्या वेगवेगळ्या किस्स्यांना रहमाननं एका मुलाखतीतून सांगितलं आहे. अमर उजालानं घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये रहमाननं वंदे मातरमच्या मेकिंगची गोष्ट सांगितली आहे. त्यावेळी त्या गाण्याचा प्रवास आपल्या दृष्टीनं किती खडतर होता हे सांगितलं आहे. रहमाननं त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, भारताचा मुलमंत्र हा वंदे मातरम आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे. संगीताची वेगळी भाषा आहे. ती समजून घेण्यासाठी विशेष परिश्रमाची गरज आहे. विदेशी संगीतकारांना याठिकाणी मोठ्या प्रमाणवर गौरव प्राप्त झाला. मला बॉलीवूडमधील दिग्गज संगीतकारांकडून खूप काही शिकायला मिळाले. याचा आनंद वाटतो. आमच्या पिढीला त्या संगीतकारांनी खूप काही दिलं. हे आम्ही नेहमी लक्षात ठेवलं आहे.
जेव्हा मी वंदे मातरम बनवायला सुरुवात केली तेव्हा मला ते गाणं पूर्ण होईल की नाही याबाबत शंका होती. त्याचा कालावधी मोठा होता. त्याचे पिक्चरायझेशन, त्यानुसार संगीताची अॅरेजमेंट, त्याचा टेम्पो, वेगळा बाज यासगळ्याचा मला बारकाईनं विचार करावा लागला होता.
आज मला समाधान वाटतं की, अजूनही ते गाणं रसिकांच्या हदयात आहे. ते गाणं ऐकताना त्यांना भरुन आल्यासारखे वाटते. यातच माझ्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटत असल्याचे रहमाननं सांगितलं. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.