Anubhav Singh Bassi Google
तू झूठी मैं मक्कार सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला अन् स्टॅंडअप कॉमेडियन अनुभव सिंग बस्सीचं नाव ट्रेंड होऊ लागलं. २-३ सीनमध्ये दिसलेल्या अनुभवविषयी सगळ्यांनाच जाणून घ्यायचे आहे.
तू झूठी मै मक्कार सिनेमात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. अनुभव सिंग बस्सीनं रणबीरच्या खास मित्राची भूमिका केली आहे. या सिनेमातून अनुभव मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. त्याची भूमिका महत्त्वाची तर आहेच पण विनोदानं भरलेली असणार आहे.
बस्सी सिनेमात कॉमेडीचा जोरदार तडका देताना दिसणार आहे. आता अनुभवचे चाहते त्याच्यासाठी खूप खूश आहेत. तर अनेकांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घ्याचं आहे.अनुभव सिंग बस्सी स्टॅंड अप कॉमेडीचा बादशहा आहे. आतापर्यंत भारतातील तब्बल ३५ शहरांमध्ये त्यानं आपल्यातील कॉमेडीची चमक दाखवलेली आहे, अनुभव परदेशातही कार्यक्रम करतो. त्याचे शो नेहमीच हाऊसफूल पहायला मिळतात. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.अनुभव उत्तरप्रदेशात राहणारा आहे. ९ जानेवारी,१९९१ साली जन्मलेल्या अनुभवनं २०१५ मध्ये डॉ.राम मनोहर लोहिया या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतून वकीलीचं शिक्षण घेतलं आहे. तसंच त्यानं अनेक वर्ष युपीएससीचा देखील अभ्यास केला आहे. बिझनेसमध्ये देखील त्यानं नशीब आजमावलं आहे. पण कॉमेडीतील त्याच्या आवडीनं त्याला त्याचं करिअर बदलायला लावलं.
२०१७ मध्ये अनुभवनं स्टॅंड-अप कॉमेडीच्या आपल्या कार्यक्रमांना सुरुवात केली..एक करिअर म्हणून. त्यानं पहिल्यांदा दिलेल्या ओपन माइक परफॉर्मन्सला २०० मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलं होतं. त्याचं स्वतःचं युट्युब चॅनेल देखील आहे. ज्याला तीन मिलियनहून अधिक लोकांनी सबस्क्राइब केलं आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे १ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.
बस्सीच्या चीटिंग,वॅक्सिंग आणि होस्टलवाल्या कॉमेडी व्हिडीओजना सगळ्यात जास्त लाइक्स आणि व्ह्यूज आहेत. सिनेमात पदार्पण करणाऱ्या बस्सीचे ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक शोज आणि व्हिडीओज रिलीज झाले आहेत. नेटफ्लिक्सच्या एका शो ला बस्सीनं होस्ट केलं होतं. जिथे त्यानं कपिल शर्माची मुलाखत घेतली होती. त्याला टेड टॉकसाठी देखील बोलावलं गेलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.