Bollywood Vs Tollywood movies news esakal
Bollywood Vs Tollywood: टॉलीवूडच्या चित्रपटांनी बॉलीवूडच्या प्रेक्षकांना आपलेसं केलं आहे. मागच्या वर्षी अल्लु अर्जुनचा पुष्पा प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर चालु वर्षी (Pushpa Movie) आरआरआर, केजीएफ2, बिस्ट आणि विक्रम या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. त्याच्यापुढे बॉलीवूडचे रथी महारथी पराभूत झाले आहे. असे कोणते चित्रपट आहेत ज्यांना टॉलीवूडपुढे शरणागती पत्करावी (Entertainment News) लागली हे आपण जाणून घेणार आहोत. काही दिवसांपासून यामुळेच की काय टॉलीवूड विरुद्ध बॉलीवूड असा संघर्ष दिसून आला आहे. त्यामुळे (Box Office Collection) एका वेगळ्या वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे.
अटॅक - जॉन अब्रामह आणि रकुल प्रीत सिंग यांचा अटॅक नावाचा चित्रपट फ्लॉप झाला. राज आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील अॅक्शन सीन्सचे प्रेक्षकांनी कौतूक केले. 70 कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं केवळ 20 कोटी रुपयांचे कलेक्शन केल्याचे दिसून आले. जर्सी - टॉलीवूडच्या जर्सी चित्रपटाचा हिंदी रिमेक असणाऱ्या जर्सी चित्रपटातील शाहिद कपूरच्या लूकचं नेटकऱ्यांनी कौतूक केलं. चित्रपटाची कथा चांगली होती. मात्र मुळ साऊथच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. 22 एप्रिलला शाहिदचा जर्सी प्रदर्शित झाला. तो 35 ते 40 कोटींत तयार झाला. त्यानं 27.9 कोटींची कमाई केली. बच्चन पांडे -
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बच्चन पांडे 18 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. असं सांगितलं जातं की, 180 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं केवळ 68.61 कोटी रुपयांची कमाई केली. क्रिती सेनन, अर्शद वारसी यांच्या भूमिका या चित्रपटामध्ये होत्या. अक्षय कुमारच्या वेगळ्या लूकला प्रेक्षकांनी साफ नाकारले.
हिरोपंती 2 - बॉलीवूडचा नवा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांच्या हिरोपंती 2 ला प्रेक्षकांनी नापसंत केले. 170 कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं फक्त 29 कोटी रुपयांची कमाई केल्याचे दिसून आले. रन वे 34 - अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्या रनवे 34 चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. मोठी स्टारकास्ट असुनही या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारले होते. 65 कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं 47.65 कोटींची कमाई केली होती. धाकड - बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगनाचा धाकड बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल अशी आशा अनेकांना होती. मात्र कंगनाच्या या चित्रपटानं प्रेक्षकांची निराशा केली. या चित्रपटाच्या ट्रेलरला तर प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. 95 कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं केवळ पावणे चार कोटींची कमाई केली. अनेक - अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेला अनेक हा 27 मे रोजी प्रदर्शित झाला. त्यात आयुषमान खुराणा यानं महत्वाची भूमिका साकारली होती. 45 कोटींत तयार झालेल्या या चित्रपटानं साडेअकरा कोटींची कमाई केली. झुंड -
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी झुंडच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचे जेवढे बजेट होते त्यातुलनेत त्याला कमाई करण्यात अपयश आले. महाराष्ट्र वगळता बाकीच्या राज्यांमध्ये या चित्रपटाला संथ प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. अमिताभ बच्चन यांनी त्यात प्रमुख भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेचं मात्र कौतूक झालं.
सम्राट पृथ्वीराज -
यशराज सारखं मोठं प्रॉडक्शन हाऊस पाठीशी उभं असताना देखील अक्षय कुमारच्या पृथ्वीराजला फारशी चमक दाखवता आली नाही. तीनशे कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या या चित्रपटानं शंभर कोटींचा आकडाही पार केला नसल्याची माहिती पुढे आली आहे. बिग स्टार कास्ट असूनही त्याचा प्रभाव फिका पडला.
जयेशभाई जोरदार
प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगचा जयेशभाई जोरदार ज्या वेगानं आला त्याच वेगानं जो बॉक्स ऑफिसवरुन गायबही झाला. प्रेक्षकांना चित्रपटाची कथा फारशी भावली नाही. भलेही रणवीरच्या अभिनयाचे कौतुक झाले असेल मात्र हा चित्रपट फ्लॉप झाल्याचे दिसून आले आहे.
* सम्राट पृथ्वीराज -
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.