देशभरात जवानांना राख्या बांधून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला
जम्मू आणि काश्मीर : पूँच येथे तैनात असलेल्या जवानांना महिलांनी राख्या बांधून रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला. (सर्व फोटो - ANI)आजच्या रक्षाबंधनादिनी जवानांना त्यांच्या बहिणींची उणीव भासू नये यासाठी आम्ही त्यांना राख्या बांधत आहोत असं रोझिया काझमी या महिलेनं म्हटलं.आपल्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या आम्ही सर्वचजणी बहिणी आहोत, अशा शब्दांत महिलांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.पंजाब : अमृतसरजवळील अटारी-वाघा बॉर्डरवर तैनात असलेल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या (बीएसएफ) जवानांना काही महिलांच्या गटानं आणि लहान मुलींनी राख्या बांधल्या.यावेळी राख्या बांधल्यानंतर बीएसएफचे जवानही भावूक झाल्याचं पहायाला मिळालं.छत्तीसगड : रक्षाबंधन दिनापासून दुर्गा फायटर्स नावानं ३२ महिला कमांडोंच दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी तैनात करण्यात आलं. सुकमा या नक्षलग्रस्त भागात या महिला कमांडो तैनात असणार आहेत. पश्चिम बंगाल : पश्चिम मदिनापूर येथील महिला, लहान मुली आणि पुरुषांनीही झाडांना राख्या बांधत त्यांचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली. याद्वारे पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली.महाराष्ट्र : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना काळात लढणाऱ्या फ्रन्टलाईन वर्कर्सना राख्या बांधल्या.यावेळी डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून त्यांच्याप्रती सन्मान व्यक्त केला.बिहार : मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पटना येथे झाडाला राखी बांधून प्रातिनिधीक स्वरुपात रक्षाबंधन साजरा केला. आपल्या या कृतीतून त्यांनी पर्यावरण जपण्याचा महत्वपूर्ण संदेश दिला. सन २०१२ पासून बिहार सरकार रक्षाबंधनाचा दिवस हा 'वृक्ष रक्षा दिवस' म्हणून साजरा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. वृक्ष जसं माणसांना जगवतात तसंच माणसांनीही वृक्षांना जगवायला हवं, असं यावेळी नितीशकुमार म्हणाले.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.