Brain buster 10 best foods: आपल्या आहारशास्त्रामध्ये आपण आवर्जुन अशा काही पदार्थांचा समावेश करायला हवा जेणेकरुन त्याचा मोठा फायदा शरीराला होईल. त्यामुळे शाररिक आणि मानसिक क्षमताही वाढेल. आज आपण अशा 10 पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपला मेंदू हा नेहमीच कार्यरत राहिल. नुसताच कार्यरत राहणार नाही तर तो सुपर कॉम्प्युटरपेक्षाही फास्ट चालेल. असं म्हटलं जातं. त्या पदार्थांना फुडब्रेन असंही म्हणतात. सततच्या धावपळीच्या युगात आपण शाररिक फिटनेसकडे लक्ष देतो मात्र मानसिकता सक्षम व्हावी म्हणून फारसं प्रयत्नशील राहत नाही. यामुळेच आहारात बदल करणे गरजेचे असल्याचे दिसून आले आहे.
कॉफी आणि ब्लॅक टी - कॅफिनयुक्त चहा आणि कॉफी आपली कार्यक्षमता वाढवतात. कॉफीमधील प्रभावी अँटीऑक्सिडेंट जे आहेत ते मेंदूला चालना देतात. याशिवाय ग्रीन टीचा आस्वाद घेणं हे फायद्याचे आहे. वयस्कांनी दिवसभरातून दोन ते तीन कप कॉफी किंवा ब्लॅक टी घेणे गरजेचे आहे. जसं की, गहु, दलिया आणि ब्राऊन राईस यातूनही आहाराचे संतुलन साधता येते. तो आपल्या संपूर्ण आहाराचा एक मोठा भाग आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की, ते गव्हामधून व्हिटॅमिन ई घेऊ शकतात.
नट्स -
प्रोटीनसाठी आपण आहारात नट्स घेत नाही. त्याचा मोठा तोटा आपल्याला होतो. नट्समध्ये पिस्ता, आक्रोड, बदाम, काजू, यांचाही समावेश आहारात असल्यास त्याचा तोटा नाही तर फायदाच आहे. बारकाईनं त्याचा विचार केल्यास पूर्ण पोषण आहार मिळेल असेही सांगितले जाते. एका रिपोर्टनुसार, वयस्क व्यक्तींनी दिवसभरातून 15 ते 30 ग्रॅम ड्रायफुट खावे. त्यामुळे त्यांची मेंटल हेल्थ निरोगी राहिल.
टोमॅटो - टोमॅटो हा मेंदूसाठी अत्यावश्यक आहे. त्याच्यातील लायकोपीन नावाचा घटक मेंदूसाठी लाभदायी असल्याचे तज्ञ सांगतात. लायकोपीन हा असा पिगमेंट आहे ज्यात कॅरोटीनॉयड असे म्हटले जाते. त्यामुळे कॅरिटोनॉईड अल्झायमर आणि पार्किसन्स सारख्या आजारांवर ते उपयोगी आहे. तुम्ही टॉमटो सॉस, पेस्ट आणि केचअपमधून लायकोपीन घेऊ शकता. तुम्ही अॅन अॅपल अ डे कीप डॉक्टर नावाची म्हण ऐकली असेल. त्यानुसार तुम्ही जर रोज एक सफरचंद खात असाल तर मग तुमच्या बऱ्याचशा शाररिक समस्या दूर होतील. मेंदूशी संबंधित अनेक आजारही सफरचंद पळवून लावेल. याशिवाय रासबेरी, ब्लॅकबेरी आणि स्ट्रॉबेरी देखील बहुगुणी आहेत.
हळदी - स्वयंपाक घरात हळद नाही असे होणार नाही. हळदीचे अनेक गुण आहेत. आपल्या शरीरासाठी लाभदायी असणारी हळद नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे बहुगुणी ठरली आहे. मेंदूसाठी देखील हळदीचे अनन्यसाधारण फायदे आहेत. आहारात काही अंशी मांसाहाराचा समावेश असणेही फायद्याचे ठरते. त्यामुळे आपल्या आवश्यक त्या पोषण द्रव्यांचा पुरवठाही होतो. जो महत्वाचा ठरतो. मासे खाणे हे आरोग्यासाठी लाभदायी आहे. अंडी - आपल्या शरीराला प्रोटीनची गरज असते. त्यात व्हिटॅंमिन बी असून बी 6, बी 12 (फोलिक अॅसिड) यांचाही समावेश असतो. जे शरीराला अत्यावश्यक असते. आहारामध्ये अंड्यांचा समावेश करण्यास डॉक्टरही सांगतात. हिरव्या पालेभाज्या -
घरातील वडिलधारी व्यक्ती आपल्याला नेहमीच आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा असे सांगायचे. त्यामागील कारण आपण कधीच विचारात घेतले नाही. याउलट नको त्या पदार्थांनी जेवणाचे ताट सजवतो. त्याचा आपल्या शरीरावर होत असल्याचे दिसून आले आहे. आहारात पालक, पानकोबी, ब्रोकली या भाज्यांचा समावेश करावा.
डार्क चॉकलेट - मेंदूला तरतरी आणण्यासाठी डार्क चॉकलेट देखील उपयोगाचे आहे. असे संशोधनातून दिसून आले आहे. तो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल. डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, फ्लेवोनाईड्स आणि कॅफीनची मात्रा भरपूर असते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.