Top 10 IT Companies in World Sakal
Top 10 IT Companies in World: माहिती तंत्रज्ञान (Information Technology-IT) क्षेत्रात भारताने (India) चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. जगातील आयटी क्षेत्रातील टॉप 10 कंपन्यांपैकी 4 कंपन्या भारतीय आहेत. एकंदरीतच भारतीय कंपन्यांनी (Indian Companies) आयटी क्षेत्रात भारताचा डंका वाजवलाय असं म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. लंडनमधील ख्यातनाम कंपनी 'ब्रँड फायनान्स' (Brand Finance) दरवर्षी आयटी कंपन्यांच्या ब्रँड व्हॅल्यूचे (Brand Value) मोजमाप करून वार्षिक यादी प्रसिद्ध करीत असते. यंदाच्या यादीमध्ये टॉप 10 कंपन्यात भारताच्या 4 कंपन्यांचा समावेश होत आहे. आयटी क्षेत्रातील टॉप 10 कंपन्यांची यादी आज आपण पाहणार आहोत. (Brand Finance has released a list of the top 10 IT companies in world)
1. Accenture- 2021 या वर्षात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या जगभरातील टॉप 10 कंपन्यांमध्ये अमेरिकन कंपनी Accenture शीर्षस्थानी राहिली. 2. TCS- टाटा समूहाची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. 16.8 बिलियन अमेरिकन डॉलर्स ब्रँड व्हॅल्यू असणारी ही भारतीय कंपनी दुसऱ्या स्थानावर आहे. 3. Infosys- आयटी क्षेत्रातील प्रसिद्ध भारतीय कंपनी इन्फोसिस टॉप 10 कंपन्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी राहिली. 12.8 अब्ज डॉलर्स एवढी ब्रँड व्हॅल्यू इन्फोसिस ही आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे. 4. IBM Consulting- अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनी IBM चे ब्रँड मूल्य लक्षणीयरित्या घसरले आहे. 5. Cognizant: अमेरिकन बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनीने कॉग्निझंट या यादीत पाचवे स्थान पटकावले आहे. 2022 मध्ये कंपनीचे ब्रँड व्हॅल्यू पूर्वीच्या 8 अब्ज वरून 8.7 अब्ज आहे.6. Capgemini: फ्रान्सस्थित कॅपजेमिनी कंपनी यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये ज्या कंपनीचे मूल्य 6.75 अब्ज होते त्या कंपनीने महसुलाच्या बाबतीत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. कंपनीचे मूल्य आता ८.१ अब्ज इतके आहे.7. Wipro: बंगलोर-आधारित विप्रो समूहाचे ब्रँड मूल्य $6.3 अब्ज आहे आणि मागील वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये 48% वाढ झाली आहे. २०२१ मध्ये विप्रोचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर होते.8. HCL- गेल्या वर्षभरात HCL च्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 10% वाढ होऊन ती 6.1 अब्ज डॉलरवर गेली आहे. कंपनीने दूरसंचार, जीवन विज्ञान, उत्पादन आणि तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रातील 58 प्रकल्पांवर स्वाक्षरी केली. 9. NTT Data- जपानी बहुराष्ट्रीय आयटी कंपनी NTT Data यादीत नवव्या क्रमांकावर आहे. तिचे मूल्य ५.८ अब्ज इतके आहे.10. Fujitsu- या जपानी बहुराष्ट्रीय आयटी कंपनीने दहाव्या स्थानावर होती. या कंपनीचे मूल्य आता 3.9 अब्ज इतके आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.