पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जालौनमध्ये बुंदेलखंड एक्सप्रेस वेचं उद्घाटन केलं.
Bundelkhand Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज जालौनमध्ये बुंदेलखंड एक्सप्रेस वेचं उद्घाटन केलं. सकाळी एका विशेष विमानानं ते कानपूर विमानतळावर पोहोचले, तिथं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते जालौनला रवाना झाले. बुंदेलखंड एक्सप्रेसवे (Bundelkhand Expressway) हा PM मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे, ज्याची पायाभरणी त्यांनी दोन वर्षांपूर्वी केली होती.
296 किमी परिसरात पसरलेल्या या एक्स्प्रेसवेमुळं आता दिल्ली ते चित्रकूटपर्यंतचा वेळ जवळपास निम्म्यानं कमी होणार आहे. जिथं आधी 12 ते 14 तास लागायचे तिथं आता हे अंतर 6 तासात पूर्ण होणार आहे. या एक्स्प्रेस वेची जमीन खरेदी करण्यासाठी 2200 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून बांधकामासाठी 14,850 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एक्स्प्रेस वेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, यात 15 हून अधिक उड्डाणपूल, 10 हून अधिक मोठे पूल, 250 हून अधिक छोटे पूल, 6 टोल प्लाझा आणि चार रेल्वे पूल आहेत.एक्सप्रेस वेची लांबी 296 किलोमीटर असून झाशी-अलाहाबाद राष्ट्रीय मार्ग क्रमांक-35 मधील चित्रकूट जिल्ह्यातील भरतकूप जवळ आहे.हा एक्सप्रेस वे चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, औरैया, इटावा या जिल्ह्यातून जाणार आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.