महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक दिवसांपासून गाजत असलेला बैलगाडा शर्यतीचा मार्ग अखेर 7 वर्षांनी खुला झाला. सर्वोच्च न्यायालयानं अटी-शर्तीसह बैलगाडा शर्यत घेण्यास परवानगी दिली.
महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक दिवसांपासून गाजत असलेला बैलगाडा शर्यतीचा मार्ग अखेर 7 वर्षांनी खुला झाला. सर्वोच्च न्यायालयानं अटी-शर्तीसह बैलगाडा शर्यत घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळालाय.सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) बैलगाडी शर्यतीवरील (Bullock Cart Race) बंदी उठविण्याचा निर्णय घेतल्यानं पुसेगावमध्ये (Pusegaon) आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
बैलगाडी शर्यत शौकीन व शेतकर्यांनी पुसेगावमधील चौका-चौकात हालगीच्या कड-कडाडात, गुलालाची उधळण करीत व फटाक्यांच्या धुमधडाक्यात जल्लोष साजरा केला. ठिकठिकाणी साखर-पेढे वाटून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं.ग्रामीण परंपरेचा भाग असलेल्या यात्रा-जत्रा, उरूस अशा धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक सोहळ्यातील आकर्षण असलेल्या बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली गेल्याने शर्यत शौकीन व शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत होती.बैलगाडी शर्यतीसंदर्भात राज्य सरकारच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर गुरुवार (दि. 16) सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठानं महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीला काही अटींवर परवानगी दिलीय. यामुळं राज्यातील बैलगाडी मालकांना दिलासा मिळाला आहे. पुसेगावसह पंचक्रोशीतील बैलगाडी मालक-चालक, तसेच शेतकर्यांनी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी प्रयत्न केले होते. याकामी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तथा गोवा राज्याचे लोकायुक्त अंबादास जोशी यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यावर बैलगाडी शर्यत शौकिनांनी पुसेगावामध्ये जल्लोष केला. यावेळी पुसेगावमधील छत्रपती शिवाजी चौक ते श्री सेवगिरी मंदिरापर्यंत बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विजय जाधव, राहुल जाधव, तानाजी वलेकर, प्रताप झांजुर्णे, पिंटू मदने, विजय भोसले, दादा घाडगे, विकास जाधव, सुजित जगदाळे, अनिल काटकर, शंकर पैलवान यांसह अनेक शेतकरी, बैलगाडी मालक-चालक व शौकीन सहभागी झाले होते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.