Champa Shashti Nashik esakal
नाशिक : चंपाषष्ठीनिमित्त पंचवटीच्या मल्हारी राजाची पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात पालखी अन् रथाची मिरवणूक निघाली. यासह गोदावरी नदीकाठी असलेल्या खंडेराव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. शहरात मोठ्या भक्तीभावाने चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जात आहे. चला पाहूया याची क्षणचित्रे...
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाचष्ठी असे म्हणतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षड्ररात्रोत्सव सुरु होतो आणि याची सांगता होण्याचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपाषष्ठी.मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले तो हा दिवस. म्हणून मल्हारी मार्तंड भैरवाचा षड्ररात्रोत्सव हा उत्सव करतात.मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासीयांच कुलदैवत आहे.चंपाषष्ठीला पंचवटीचा मल्हारी राजा देवस्थान ट्रस्ट संस्थापक गुरुवर्य रवींद्र दादा निकम यांच्या वतीने गंगा घाट ते नाशिकची प्रथम मानाची पालखी यात चांदीचा खंडोबा महाराज आणि मल्हार रथाची मिरवणूक काढण्यात आली. गेल्या 25 वर्षा पासुन सदर परंपरा अविरत सुरू आहे.यावेळी मल्हारी मार्तंड वेशभूषा साकारण्यात आली होती.या रथोत्सवात अनेक भाविकांनी आपला सहभाग नोंदविला.मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासीयांच कुलदैवत आहे.चंपाष्ठीला कुलदैवत खंडोबाची तळी भरली जाते. तळी भरणे हा एक कुळाचार आहे असं शास्त्र अभ्यासक सांगतात.भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने गोदाकाठी खंडेरायाची तळी भरली.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.