turtle neck esakal ,pinterest.
आपण स्वतःला कसे 'कॅरी' करतो यावर आपल्या 'पर्सनॅलिटीचे रिफ्लेक्शन' (personality reflection)अवलंबून असते . पण "कम्फर्ट इज फॅशन" (comfort is fashion)असं कितीही म्हणलं तरी ,'फॅशन' करताना कम्फर्ट बॅक सीट वर येतं. पण काही कपडे असे आहेत जे कम्फर्ट आणि फॅशन या दोन्ही गोष्टी चोखपणे करू शकतात तेही एकाच वेळी. या बाबतीत बोलताना पहिल्यांदा समोर येतात ते 'टर्टल नेक्स'. (turtle necks)
'टर्टल नेक्स' नेहमीच फॅशनमध्ये असतील? नक्कीच ती एक मुख्य वस्तू आहे जी प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये असावी. आज तुमच्या कम्फर्टेबल फॅशनसाठी या काही भन्नाट निवडी येथे आहेत. 'टर्टल नेक्स' उर्फ 'पोलो नेकचा'(polo neck) फॅशन जगात मोठा चाहतावर्ग आहे. फॅशनच्या जगात प्रत्येकाला माहित आहे की टर्टल नेक हे फॉर्मल शर्टपेक्षा अतिशय सुंदर आणि नीटनेटके असतात.1860 मध्ये पोलो खेळाडू जेव्हा ते घालून खेळत होते. तेव्हापासून ते फॅशन मध्ये आले, तेव्हा हे सर्व सुरू झाले. त्यामुळे त्यांना मूळतः "पोलो नेक्स" म्हणून ओळखले जाते.फॉर्मल लूक असो,(formal look) कॅज्युअल लूक(casual look) असो वा 'स्वेटशर्ट' म्हणून असो, 'टर्टल नेक्स' हे सर्व करतात. 90 च्या दशकात टर्टल नेक्स कुप्रसिद्ध होते नंतर अनेक सेलिब्रिटींनी(celebrities) ते आवडीने कॅरी केले .अगदी लोकप्रिय टीव्ही शो “फ्रेंड्स ”(friends) मध्ये त्यांनी जणु कॅमिओच केला होता. नंतर हळूहळू ते फॅशनच्या दुनियेपासून दूर जाऊ लागले. ब्लॅक आणि ग्रे रंगांमध्ये ते आणखीनच क्लासी दिसतात. आता २१ व्या शतकात, लहान मुलांपासून ते ज्येष्ठवर्गापर्यंत ही स्टाईल सर्वांची आवडती बनली आहे. जॅकेटखाली टर्टलनेक घालणे हे नेहमीच स्टाईलमध्ये असते परंतु ते नेहमीच युरोपियन पुरुषांच्या मासिकांच्या मागच्या पेजवर राहिले आणि काही उच्चभ्रू लोकांपुरते मर्यादित राहिले.
अगदी कमी एफर्टस मध्ये क्लासिक लूक(classic look)हवा असेल तर नक्कीच टर्टल नेक्स हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या 'स्पोर्ट्स जॅकेटखाली 'टर्टलनेक नक्कीच घालू शकता. वरील फोटोमध्ये घातलेल्या रंगांना प्राधान्य दिले जाते. तुम्ही डेनिम किंवा कोणत्याही स्कर्टसह टर्टल नेक टॉप घालू शकता. स्कर्ट लहान असल्यास हिल्स सह(heels)एकत्र करा नाहीतर स्कर्ट लॉंग (long skirt)असल्यास तुम्ही बेल्ट(belt)नी एकत्र करू शकता. तसेच, जर स्कर्ट आणि टॉप एकाच रंगाचा असेल तर त्याच रंगाचा टर्टल नेक तुमचा लुक कंप्लीट करेल.(complete look)सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.