देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाई करण्यासाठी परवानगी दिली आणि भुजबळ यांच्यावर कारवाई सुरु झाली होती. मार्च २०१६ साली भुजबळ यांची १० तासांपेक्षा जास्तवेळ चौकशी करण्यात आली होती, यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे दोन वर्ष ते तुरुंगात होते. आज महाराष्ट्र सदनाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह सहा आरोपींना दोषमुक्त केलं आहे.जाणून घेऊया भुजबळ यांच्याविषयी...
अशी झाली राजकारणात एंट्री :
छगन भुजबळ मुंबईतल्या भायखळा मार्केटमध्ये भाजी विकत असताना बाळासाहेब ठाकरें यांचे भाषण एेकत असत. त्यांच्यापासून प्रभावित होऊन त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला.तब्बल दोन दशकं शिवसेनेत कार्यकर्ता, नगरसेवक ते महापौर असा राजकीय प्रवास केल्यानंतर छगन भुजबळ 1991 साली सेनेतून बाहेर पडले.
छगन भुजबळांना नाटक-सिनेमाची आवड होती. शिवसेनेत असताना बेळगावच्या आंदोलनात वेश बदलून ते सीमाभागात घुसले होते. मुंबईत दाक्षिणात्यांच्या विरोधात उभारलेले आंदोलन ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’चा नारा हा त्या काळातील परिस्थीतीनुसार होता. त्यावेळी छगन भुजबळांचं नाव देशभरात गाजलं.
1999 साली शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेले. त्याच वर्षी काँग्रेस-राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि भुजबळ महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळांचा महाराष्ट्र राज्य विधानसभेची निवडणूक जिंकल्याबद्दल सत्कार करताना मुंबईत महाराष्ट्र राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची घोषणा केली.जवळपास 26 महिने छगन भुजबळ जेलमध्ये होते. गृहमंत्री असताना त्यांनी आर्थर जेलमध्ये अंडा सेलची निर्मिती केली होती. त्याच अंडा सेलमध्ये भुजबळांची पहिल्यांदा रवानगी झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.