आधार कार्ड हे आज महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी हा एक अतिशय महत्वाचा दस्तऐवज आहे. नवजात मुलांसाठीही आधार कार्ड बनवले जाते. UIDAI च्या मते, नवजात मुलाचे आधार कार्ड बर्थ डिस्चार्ज सर्टिफिकेट आणि पालकांच्या आधार कार्डद्वारे तयार केले जाते.
देशभरात नवजात मुलासाठी आधार कार्ड बनवले जात आहेत. परंतु मूल पाच वर्षांचे झाल्यानंतर, बायोमेट्रिकसह आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. अन्यथा, मुलाचे आधार कार्ड इनएक्टिव होऊ शकते.UIDAI ने ट्विट करून माहिती दिली आहे की, नवजात मुलाचे आधार 5 वर्षांपर्यंत वापरले जाऊ शकते. जर 5 वर्षानंतर बायोमेट्रिक अपडेट केले नाही तर मुलाचे आधार इनएक्टिव होते. 5 वर्षांनंतर, जेव्हा मुल 15 वर्षांचे होईल, तेव्हा बायोमेट्रिक अपडेट करावे लागेल.मुलांसाठी हे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तुम्ही तुमच्या मुलाचे आधार अपडेट करण्यासाठी एकदा तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्रात जावे लागेल.नवजात मुलांसाठी म्हणजे 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आधार कार्ड मिळवण्यासाठी कोणतेही निकष (क्राइटेरिया) पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. यामध्ये बायोमेट्रिक डेटा देखील आवश्यक असणार नाही. आधारची प्रक्रिया आणि प्रमाणीकरण पालकांच्या आधारे केले जाईल. मुलाची आधार वेरिफिकेशन केवळ पालकांच्या डेमोग्राफी आणि फोटोग्राफने केली जाईल.
UIDAI नुसार, 5 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलाचे बायोमेट्रिक्स अपडेट करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रात जावे लागेल. नवजात मुलाचे फिंगरप्रिंट घेतले जात नाही. पण जेव्हा मुल 5 वर्षांचे होईल, तेव्हा फिंगरप्रिंट अपडेट करावे लागेल.आधार केंद्रात अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी, तुम्हाला UIDAI वेबसाइट https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx ला भेट द्यावी लागेल. येथे Book an appointment वर क्लिक करा. त्यानंतर लोकेशन डिटेल्स भरा आणि Proceed to Book an appointment वर क्लिक करा.सर्व माहिती वेरिफाय केल्यानंतर अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी सबमिटवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्यूमेंट्ससह Aadhar enrolment centre मध्ये जावे लागेल.नवजात मुलांसाठी म्हणजे 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आधार कार्ड मिळवण्यासाठी कोणतेही निकष (क्राइटेरिया) पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. यामध्ये बायोमेट्रिक डेटा देखील आवश्यक असणार नाही.आधारची प्रक्रिया आणि प्रमाणीकरण पालकांच्या आधारे केले जाईल. मुलाची आधार वेरिफिकेशन केवळ पालकांच्या डेमोग्राफी आणि फोटोग्राफने केली जाईल.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.