children's ward ready in Bytco Corona Center Nashik esakal
नाशिकरोड : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये (Corona Third wave) लहान बालकांनादेखील धोका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकरोड येथील महापालिकेच्या बिटको कोविड सेंटरमध्ये बालकांवर उपचार करण्यासाठी शंभर खाटाचे बालकक्ष उभारण्यात आले. उपचारासाठी दाखल झालेल्या बालकांचे मनोरंजन व्हावे आणि त्यांची मानसिक स्थिती ही सकारात्मक रहावी त्यासाठी कक्षामध्ये भिंतीवर विविध कार्टूनची चित्रे काढण्यात आली आहेत, त्यावर कविता, गाणीसुध्दा आहेत. तसेच घसरकुंडी पाळणा आदी खेळणी ठेवण्यात येणार आहेत.
नाशिक महापालिकेच्या नाशिकरोड येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार योग्य पद्धतीने होत असल्याने शहरापेक्षा बाहेरील गावचे रुग्ण येथे येतात.
सध्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून सेंटरमध्ये कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याने त्यांच्यासाठी खास बाल कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या बालकांचे मनोरंजन व्हावे आणि त्यांची मानसिक स्थिती ही सकारात्मक रहावी त्यासाठी कक्षामध्ये भिंतीवर विविध चित्रे काढण्यात आली त्यावर कविता, गाणी आहेत.लहान मुलांनादेखील कोरोना होत असल्याने विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे.वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी लावलेले कार्टून हे कविंतांसोबत ज्ञान देणारेही आहेत.लहान मुलांचा आवडता छोटा भीमचे कार्टून पोस्टर लावण्यात आले आहे.बालकांची मानसिक स्थिती सकारात्मक राहील्यास ते आजारावर लवकर मात करतील. लहान मुलांसाठी जिनी चे कार्टून पोस्टरनाशिक जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात तिसरी पुन्हा लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.