-अजय सावंत
कुडाळ : ''सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी परुळे येथे 9 ऑक्टोंबरपासून विमानसेवा सुरळीत होत आहे, ही विमानसेवा जिल्ह्याच्या विकासाला नवीन दिशा ठरणारी आहे. केवळ एकच विमान घेऊन आम्ही थांबणार नाही तर, भविष्यात या ठिकाणी अनेक विमाने यावीत जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा या अनुषंगाने आम्ही नियमित विमानसेवा सुरू करता येईल. त्याचबरोबर कार्गो सेवेला कसे प्राधान्य देता येईल, या दृष्टीने आमचे प्रयत्न राहणार आहेत'' अशी माहिती सकाळशी बोलताना शिवसेना लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत यांनी दिली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोंकण रेल्वे सुरू झाली. मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरण झाला. विकासाच्या दिशेने सिंधुदुर्ग झेपावत असतानाच आता गेले कित्येक वर्षे सिंधुदुर्गवासीयांच्या स्वप्नातील चिपी परुळे येथे सुरू होत असलेला सिंधुदुर्ग विमानतळ हा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात भर टाकणारा आहे. 9 ऑक्टोबरला ही विमानसेवा सुरू होत आहे या अनुषंगाने विमानसेवा सुरू होण्यासाठी सातत्याने खासदार विनायक राऊत यांनी पाठपुरावा केला आहे सातत्याने चिपी ठिकाणी अधिकारी वर्ग आयआरबी कंपनी यांच्याशी संपर्क ठेवून वेळोवेळी आलेल्या विविध समस्या त्यांनी मार्गी लावल्या आहेतयाबाबत सकाळशी बोलताना खास राऊत म्हणाले,'' ही विमानसेवा जिल्ह्याच्या विकासाला नवीन दिशा ठरणारी आहे कार्गो सेवेच्या माध्यमातून येथील आंबा मच्छी कोंकणी मेवा दिल्लीसह अन्य राज्यात परदेशात कसा जाईल यादृष्टीने आमचा प्रयत्न राहणार आहे. विमान सेवा सुरू झाल्यानंतर येणाऱ्या पर्यटकांसाठी हॉटेल थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलची सुविधा देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.''राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून शिरोडा वेळागर जो ताज प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेला आहे. ताज बरोबरच इतरही हॉटेल उभी राहत असताना पर्यावरणाला पूरक ठरणारे हॉटेल व्यवसाय असतील त्याला प्राधान्य देण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होणार आहे. 9 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विमानसेवेबाबत राऊत म्हणाले, ''सध्या तर दिवसा एकच विमान आहे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून दुसरे विमान सुरू करण्यासाठी तत्वता मान्यता मिळालेली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचं असेल तर धावपट्टी ही केवळ साडेतीन किलोमीटरची आवश्यक आहे. त्याबाबतचा बेस ठरला आहे, यासाठी एअर ऑपरेटर आयआरबीच्या संपर्कात असून त्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या ठिकाणी चार्टर प्लाइट उतरू शकतात त्याबद्दल दुमत नाही मात्र, पार्किंगची सोय होण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल यासाठी प्रयत्न राहतील.पहिले सहा महिने दिवसाची विमानसेवा सुरू होईल, सहा महिन्याच्या आत 33 केव्ही वीज वहिनी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. ती दिल्यानंतर रात्रीची विमानसेवा सुद्धा सुरू होऊ शकेल. 33 केव्ही साठी जो निधी लागणार त्याची तरतूद झालेली आहे. काही ठिकाणी भूमिगत विद्युत वहिनी टाकल्या जातील. बाकीच्या ठिकाणी नियमितपणे टाकल्या जातील. सहा महिन्याच्या आत 33 केव्हीचा पावर सप्लाय दिला जाईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत
सिंधुदुर्ग: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीकाळी शिवसेनेत एकत्र असणारे हे दोन नेते सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. गेल्या काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांचं उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर त्यांचं अटकसत्र या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम आणि त्यांचं एका मंचावर येणं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.